शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

nanar refinery project: भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची उभारणी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:19 IST

राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.

राजापूर : कोकणामध्ये मोठा प्रकल्प यावा असा आपला मानस आहे. त्याची उभारणी करताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे स्थानिकांसह भूमिपुत्रांशी चर्चा करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजापूर येथे दिली. मात्र, रिफायनरी नाणार येथे हाेणार नाही हे स्पष्ट करत रत्नागिरी जिल्ह्यात अन्य काेठेही प्रकल्प उभारताना स्थानिकांचे मत जाणून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे जात असताना राजापूरवासीयांसह रिफायनरी समर्थकांनी आदित्य ठाकरे यांची मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली.

यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, गटविकास अधिकारी सागर पाटील, रिफायनरी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर, पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला उपस्थित होत्या.धोपेश्वर, बारसू, सोलगाव परिसरातील रिफायनरी समर्थक मोठ्या प्रमाणावर राजापूर विश्रामधाम येथे उपस्थित होते. त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रकल्प समर्थनाच्या फलकांसह बुलंद घोषणा यावेळी देण्यात आल्या. राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करताना स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमिपुत्रांना नोकऱ्या, महिलांना रोजगार मिळण्याला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. या संदर्भात स्थानिकांसह भूमिपुत्रांशी चर्चा करण्याची सूचना संबंधित कंपनीला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. साऱ्यांना विश्वासात घेऊन, चर्चा करून प्रकल्प उभारणीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAditya Thackreyआदित्य ठाकरेnanar refinery projectनाणार प्रकल्प