दापोलीवर माझे विशेष प्रेम : संतोष भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST2021-03-21T04:30:00+5:302021-03-21T04:30:00+5:30

दापाेली तालुक्यातील गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर यांच्या हस्ते संताेष भाेसले यांचा सत्कार करण्यात आला. लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली ...

My special love for Dapoli: Santosh Bhosale | दापोलीवर माझे विशेष प्रेम : संतोष भोसले

दापोलीवर माझे विशेष प्रेम : संतोष भोसले

दापाेली तालुक्यातील गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर यांच्या हस्ते संताेष भाेसले यांचा सत्कार करण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : तालुक्यातील सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळेच आपण व्हिजन दापोली व आविष्कारसारखे प्रभावी उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. दापोलीमध्ये मला माझ्या मनातले सर्व उपक्रम घेता आले. दापोलीवर माझे विशेष प्रेम आहे व यापुढेही राहील, असे उद्गार दापोलीचे माजी गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी दापोली येथील कार्यक्रमात काढले.

दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच दापोली नं.१ या शाळेत आयोजित करण्यात आली होती. याच कार्यक्रमात दापोली पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलेल्या व आता खेड पंचायत समितीत बदली होऊन गेलेल्या संतोष भोसले यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर व गिम्हवणे केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. संतोष भोसले यांच्या दापोली येथील कारकीर्दीबद्दल गिम्हवणे केंद्रातील अनेक शिक्षकांनी मनोगतातून गौरवोद्गार काढले. यावेळी गिम्हवणे केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने केंद्रप्रमुख प्रवीण काटकर यांनी संतोष भोसले यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.

Web Title: My special love for Dapoli: Santosh Bhosale