कोतळुकमध्ये ‘माझी रत्नागिरी’ मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:34+5:302021-05-13T04:31:34+5:30
असगोली : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळुक येथे ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून, लोकप्रतिनिधी, ...

कोतळुकमध्ये ‘माझी रत्नागिरी’ मोहीम सुरू
असगोली : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळुक येथे ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत.
कोतळुक ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांची ३ पथके तयार करण्यात आली. येथे सुमारे ७९४ कुटुंब असून, २,६६५ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या महिनाभरात कोतळुकमध्ये कोराना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम कृती दल, आरोग्य विभाग यांनी योग्य नियंत्रण ठेवत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
आता ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ या उपक्रमात गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन तपासणी केली जात आहे, लसीकरणासाठी आवाहन केले जात आहे. या पथकांमध्ये उपसरपंच संजीवनी जावळे, ग्रामपंचायत सदस्य विजय भेकरे, रमेश गोरिवले, शीतल गोरिवले, संचिता गुरव, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, तलाठी सुशीलकुमार परिहार, पोलीस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, आशासेविका नेत्रा आरेकर, रश्मी काताळकर, प्राजक्ता गुरव, श्रद्धा कावणकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर, कोतवाल अमित आरेकर, शिक्षक माधुरी पाटील, महेश सुर्वे, नीलम जगताप, उमेश चाफे, सुकन्या पावरी, मानसी उकार्डे, संस्कृती ढवळ, संध्या नेटके, रेणुका पत्याणे समावेश आहे. आरोग्य विभागाचे श्रीमती शेळके, नीलेश आढाव यात विशेष सहकार्य करत आहेत.