भालावली येथे ‘माझी रत्नागिरी...’ माेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:33+5:302021-05-11T04:33:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी, मुक्त रत्नागिरी मोहीम या कार्यक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील भालवलीमध्ये खालचा भंडारवाडा ...

भालावली येथे ‘माझी रत्नागिरी...’ माेहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी, मुक्त रत्नागिरी मोहीम या कार्यक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील भालवलीमध्ये खालचा भंडारवाडा येथील शेकडो कुटुंबांची पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.
ग्राम कृती दल, भालवलीने गठीत केलेल्या या पथकामध्ये स्वयंसेवक चंद्रकांत नागले, स्वयंसेविका आशा सांडये, ग्राम कृती दल सदस्य अमोल नार्वेकर, भालवली शाळा नंबर ३चे शिक्षक संतोष पेवेकर आणि पथक क्रमांक २ मध्ये स्वयंसेविका नार्वेकर, ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश जाधव आणि शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. या पथकाने भालवलीतील खालचा भंडारवाडा येथे घरोघरी जाऊन ग्रामस्थांची तपासणी केली. या मोहिमेला ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
---------------------------
माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत भालवली येथील खालचा भंडारवाडा येथे कुटुंबियांची पथकाद्वारे तपासणी करण्यात आली.