कोंडगावमध्ये तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:03+5:302021-05-12T04:32:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथील राकेश मारुती सावंत (३५) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची ...

Murder of a youth in Kondgaon | कोंडगावमध्ये तरुणाचा खून

कोंडगावमध्ये तरुणाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-बाईंगवाडी येथील राकेश मारुती सावंत (३५) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. खून केल्यानंतर घरापासूनच पाचशे ते सहाशे मीटर लांब असलेल्या शिंदेवाडी येथील जवळच असलेल्या शेवरपऱ्यात टाकण्यात आले.

याबाबतची माहिती कोंडगावचे पोलीस पाटील मारुती शिंदे यांना समजताच साखरपा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्यासहित पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय मारळकर, महिला पोलीस नाईक अर्पिता दुधाणे, वैभव कांबळे, पोलीस पाटील मारुती शिंदे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती वरिष्ठांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे, पोलीस निरीक्षक मायती जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

यावेळी मृत राकेश सावंत यांची पँट व रुमाल घटनेपासून काही अंतरावर पडलेली होती तर शव पाण्यात पडलेले होते. मृतदेह पाण्याबाहेर काढले असता ही व्यक्ती राकेश मनोहर सावंत असल्याची ओळख पटविण्यात आली. मात्र, हा खून नेमका किती वाजता झाला, कोणत्या कारणासाठी झाला व का झाला, याचे कारण अद्याप समजले नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळपर्यंत याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: Murder of a youth in Kondgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.