शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 16:59 IST

मृत तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे.

दापोली : तालुक्यातील वणौशी खोतवाडीत दोन सवती आणि अन्य एक महिला अशा तिघींचा संशयास्पद मृत्यू झाला. या तिघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) तसेच इंदुबाई शांताराम पाटणे (८०) अशी या तिघींची नावे आहेत. त्यांच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.दापाेली पाेलिसांनी याबाबत चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डाेक्यात प्रहार करुन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी शशिकिरण काशीद हे करत आहेत.पार्वती आणि सत्यवती या सवती होत्या. इंदुबाई या त्यांच्या जाऊ शेजारच्या घरात राहत होत्या. या तिन्ही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी एकत्र झोपल्या. परंतु सकाळी हा दुर्दैवी प्रकार उघड झाला. हा प्रकार नेमका रात्री घडला की, सकाळी घडला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पार्वती व सत्यवती या दोघींनाही मूलबाळ नसल्याने त्यांचा पुतण्या त्यांचा सांभाळ करत होता. शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्याही घरी एकट्या असत. त्यामुळे त्या झोपण्यासाठी पार्वती, सत्यवतीकडे जात असत. तीन महिलांचा एकाच ठिकाणी खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यादृष्टीने पाेलीस तपास सुरु आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीCrime Newsगुन्हेगारी