शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दुसरे लग्न टिकण्यासाठी आर्याचा खून; मालिका बघून आत्महत्या केल्याचा केवळ बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 18:29 IST

पती राजेश यांनी केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा खून केला आहे. सुनंदा चव्हाण आणि नणंद अनिता चांदेकर यांनी मुलीचा खून केला

लांजा : तालुक्यातील काेर्ले येथील सात वर्षीय आर्याच्या आत्महत्येचा तपास सुरु असतानाच ही आत्महत्या नसून खूनच असल्याची तक्रारी तिच्या आईने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने केलेले दुसरे लग्न टिकावे आणि उघडकीला येऊ नये यासाठीच आर्याचा खून केल्याचे आई माया चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल केला आहे.कोर्ले सहकारवाडी येथील आर्या राजेश चव्हाण या चिमुकलीने घराच्या भिंतीच्या खिळ्याला गळफास तयार करुन गळफास घेतल्याची घटना दि. १२ जून रोजी घडली हाेती. शनिवारी आर्याची आई माया राजेश चव्हाण (वय ३४, रा. बी. बी. वडगाव, ता. फलटण) हिने लांजा पोलीस स्थानकात येऊन हा खून असल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार सावत्र सासू सुनंदा सुभाष चव्हाण, चुलत नणंद अनिता नागेश चादेकर, सासरे सुभाष नारायण चव्हाण, दीर दीपक, सुरज, पती राजेश, सवत काजल राजेश चव्हाण (सर्व रा . कोर्ले सहकारवाडी), सेजलचे वडील सर्जेराव नारायण मोहिते (रा. राजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माया चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, राजेश सुभाष चव्हाण यांच्या समवेत दि. १० जुलै २००५ मध्ये विवाह झाला. प्रिया (१६), अनुजा (१२), आर्या या तीन मुली आहेत. मुलगा होत नसल्याने ते माझा मानसिक छळ करीत होते. या छळाला कंटाळून दीड वर्षापूर्वी माहेरी फलटण येथे राहण्यासाठी गेले हाेते. माहेरी गेल्याचा फायदा उठवत कायदेशीर सोडचिठ्ठी न घेता पतीने दुसरे लग्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दुसरे लग्न केल्यामुळे आल्यावर गुन्हा दाखल हाेईल या भीतीपाेटी राजेशने माया यांच्याशी चांगले वागण्याचे नाटक केले. या चांगल्या वागण्याच्या दरम्यान त्याने आपल्या दाेन मुली अनुजा व आर्या यांना काेर्ले येथे आणले. यावेळी सासू सुनंदा चव्हाण व सवत काजल चव्हाण यांनी दाेन्ही मुलींना त्रास देणे सुरूच ठेवले हाेते. पती राजेश यांनी केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा खून केला आहे. सुनंदा चव्हाण आणि नणंद अनिता चांदेकर यांनी मुलीचा खून केला आहे. त्यांना कुटुंबातील सर्वांनी सहकार्य केल्याचेही म्हटले आहे.आधीच संशयघटनेनंतर आर्याचा मामा व नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र, पोलिसांनी नंतर तुमची तक्रार घेतली जाईल प्रथम शव ताब्यात घ्या, असे सांगितले हाेते. तर मालिका बघून आत्महत्या केली हा केवळ बनाव केला हाेता. बहिणीने आजीच्या दबावापाेटी खाेटा जबाब दिल्याचे माया चव्हाण यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी