चिरणी ग्रामस्थांसह मुंबईकरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:34+5:302021-09-05T04:35:34+5:30
आवाशी : चिरणी (ता. खेड) येथील उत्कर्ष मंडळ मुंबईतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा ...

चिरणी ग्रामस्थांसह मुंबईकरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
आवाशी : चिरणी (ता. खेड) येथील उत्कर्ष मंडळ मुंबईतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा पुढे करत जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
खेड व चिपळूण तालुक्यांतील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांचे उघड्यावर आलेले संसार, त्यांची झालेली अपरिमित हानी भरून काढण्यासाठी सामाजिक भावनेतून मुंबई मंडळातर्फे आवाहन करण्यात आले हाेते. या आवाहनाला प्रतिसाद देत चिरणी ग्रामस्थ उत्कर्ष मंडळ मुंबईतर्फे एक लाखाच्यावर मदतनिधी गोळा केला. त्यातून पूरग्रस्तांना स्वयंपाकघरातील गॅस शेगडी व मिक्सर खरेदी करून कळंबस्ते, मिरजोळी, पेठमाप, खेर्डी, मार्कंडी, चिंचनाका, पवारआळी येथे प्रत्यक्ष जाऊन त्यांना वितरित करण्यात आले.
याकामी चिरणीचे उपसरपंच अविनाश आंब्रे, प्रभाकर आंब्रे, किशोर आंब्रे, योगेश आंब्रे, विजय आंब्रे, सत्यवान आंब्रे, नवनाथ आंब्रे, सुशांत आंब्रे, विकी आंब्रे यांनी सहकार्य केले, तसेच माजी सभापती मोहन आंब्रे, जगदीश आंब्रे, संजय आंब्रे यांनीही मार्गदर्शन केले. पुणे मंडळाचे सरचिटणीस कॅ. भास्कर आंब्रे व मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे योगदान लाभले.