मुंबई - कुडाळ दरम्यान धावणार विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:51+5:302021-09-05T04:35:51+5:30
रत्नागिरी : मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला ...

मुंबई - कुडाळ दरम्यान धावणार विशेष रेल्वे
रत्नागिरी : मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे काेकणात गणेशाेत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर हाेणार आहे.
गाडी क्रमांक ०१२६९ ही वातानुकूलित गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत पहाटे ४.३५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याचदिवशी दुपारी २.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२७० ही वातानुकूलित गाडी कुडाळ येथून याच तारखांना दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकात थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे आरक्षण ४ सप्टेंबरपासून उपलब्ध करण्यात आले आहे.