रेल्वेने अवघ्या १८० रुपयात मुंबई - रत्नागिरी प्रवास
By मनोज मुळ्ये | Updated: June 8, 2023 12:54 IST2023-06-08T12:54:01+5:302023-06-08T12:54:09+5:30
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वनवे स्पेशल ट्रेन दिनांक ९ जून रोजी धावणार आहे.

रेल्वेने अवघ्या १८० रुपयात मुंबई - रत्नागिरी प्रवास
रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वनवे स्पेशल ट्रेन दिनांक ९ जून रोजी धावणार आहे. विशेष म्हणजे ज्या प्रवासासाठी खासगी बसेसना हजार ते पंधराशे रुपये मोजावे लागतात तोच मुंबई ते रत्नागिरी प्रवास या गाडीने अवघ्या १८० रुपयात करता येणार आहे. पहाटे ५:३० वाजता ही गाडी मुंबईतील सीएसएमटीवरून सुटून दुपारी १२:२९ वाजता रत्नागिरीला पाेहाेचणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांना आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. गर्दीमुळे रेल्वे प्रवाशांना तिकीटही मिळत नसल्याने खासगी बसेसना हजार ते पंधराशे रुपये माेजावे लागत आहेत. गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ट्रेन मुंबईतून शुक्रवारी सुटणार असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी हाेणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ही एक दिशा मार्ग गाडी शुक्रवार, ९ जून २०२३ रोजी मुंबई सीएसएमटी येथून पहाटे ५:३० वाजता सुटणार आहे. मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी ५:२० वाजता पाेहाेचणार आहे. या गाडीला एकूण १६ एलएचबी कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम १ कोच, एसी चेअर कार ३ कोच, सेकंड सीटिंग १० कोच, एसएलआर ०१ आणि जनरेटर कार १ काेच असणार आहे.