शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:45 IST

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला.

पनवेल / अलिबाग / रत्नागिरी: मुंबई-गोवामहामार्गाच्या रुंदीकरणाबाबत दोन कंत्राटदार बदलावे लागले. सन २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच दिलेल्या  संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आठ वर्षांच्या कार्यकाळात अधिकारी बदलले, कंत्राटदार बदलले, त्यामुळे मुंबई-गोवामहामार्ग रखडला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच आता मी या खात्यावर कायम असल्याने येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या रखडलेल्या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्या मागे लागलो, त्यानंतर त्यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. पळस्पे ते इंदापूर महामार्गही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे गडकरींनी सांगितले.  यावेळी गडकरी यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल.  

कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठठाकूर,जे. एम. म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता एस शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते.

महामार्गावर टोल नकोच आजवर या मार्गावर हजारोंना जीव गमवावा लागला. या मृतांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर या मार्गावर टोल नाके नको, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली.

उपग्रहावर आधारित टोल वसुलीमहामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, अशी  माहिती गडकरी यांनी दिली.

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवाRatnagiriरत्नागिरी