शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:59 IST

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी  ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी  ९.३०  वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देजगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंदरस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी  ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी  ९.३०  वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.  

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारीही जोरदार फटका बसला. मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात पडणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे. सह्याद्री खोऱ्यातील  ३२ गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क कुठला आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले. चिपळूण बाजार पुलावरून पाणी वाहू लागले आहे ते दाखवणे महामार्गावरील सेनगाव पाण्यात आलेले आहे. प्रथम बाजारपेठ भाग आणि त्यानंतर चिंचनाका भाग पाण्याखाली गेला. शहरातील मुख्य बस स्थानकादरम्यानही ढोपरभर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घराःंना धोका निर्माण झाला आहे.

रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे. चिपळूणप्रमाणेच खेडलाही पावसाचा फटका बसला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील मच्छीमार्केटही पाण्याखाली गेले आहे. जगबुडी नदीचे पाणी ७ मीटरपर्यंत वाढल्यानंतर धोक्याची सूचना दिली जाते. आता पाणी आठ मीटरपर्यंत वाढले आहे.

रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद  झाला आहे. रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे. रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद  झाला आहे. गुहागर-भातगाव-रत्नागिरी मार्ग मेढे तर्फे फुणगुस येथे मोठी दगड व दरड कोसळल्याने तसेच रस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे.

दापोली-खेड हा मार्ग बंद आवाशी गावात नवीन पूल सुरक्षित असून देऊळ वाणी आवाशी देऊळवाडीकडे जाणारा पूल तुटला आहे, त्याचे सध्या बांधकाम सुरू होते. रात्रीपासून पावसात पाऊस सुरू असून नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. दस्तुरी-साखरोळी दापोली मार्गावर पानी आले असून दस्तुरी येलवली नदीला पूर आला आहे. यामुळे सॉ मिल व बेघर वसाहतमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी