शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा : महामार्गावर उष्णतेचा जाळ, धुरळ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:18 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी जिल्ह्यात जागोजागी डोंगराची कटिंग्ज जेसीबीद्वारे काढली जात आहेत. त्यामुळे महामार्गावर कोसळणाऱ्या या कटिंग्जचा धुरळा तेथील वातावरणात भरून राहिला आहे. त्याचवेळी उन्हाळी वातावरण असल्याने व महामार्ग रुंदीकरणात झाडांची कत्तल झाल्याने महामार्ग मोकळा झाला असून, सावलीचा पत्ताच नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा : महामार्गावर उष्णतेचा जाळ, धुरळ्याचे साम्राज्यकोकणात येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच दमछाक

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी जिल्ह्यात जागोजागी डोंगराची कटिंग्ज जेसीबीद्वारे काढली जात आहेत. त्यामुळे महामार्गावर कोसळणाऱ्या या कटिंग्जचा धुरळा तेथील वातावरणात भरून राहिला आहे. त्याचवेळी उन्हाळी वातावरण असल्याने व महामार्ग रुंदीकरणात झाडांची कत्तल झाल्याने महामार्ग मोकळा झाला असून, सावलीचा पत्ताच नाही, अशी स्थिती आहे.आधीच महामार्गावर धुरळा व त्यात उन्हाचा जाळ यामुळे महामार्गावरून प्रवास करणे आगीतून प्रवास करण्यासारखे ठरत आहे.महामार्ग रुंदीकरणाचे काम जिल्ह्यात खेड व चिपळुण भागात जोराने सुरू आहे. राजापूर ते खारेपाटण भागातही काम जोरात आहे. आता आरवली ते कांटे दरम्यान कामालाही गती आली आहे. मात्र, महामार्ग रुंदीकरणासाठी हजारो झाडे तोडण्यात आली आहेत.रुंदीकरणाचा भराव करण्यात आला आहे. रुंदीकरणात अनेक ठिकाणचे डोंगर येत असून, ठेकेदारांकडून सध्या डोंगर कापण्याचे काम सुरू आहे. डोंगराची ही कटिंग्ज काढताना महामार्गालगत कोसळत असून, त्याचा प्रचंड धुरळा महामार्गावर दिसून येत आहे.चौपदरीकरणासाठी परशुराम घाट तसेच अन्य डोंगराचा भाग असलेल्या ठिकाणी सध्या जोरदार काम सुरू आहे.

अत्याधुनिक यंत्रांद्वारे डोंगर पोखरणे, कापणे, मार्ग रुंदीकरण करणे ही कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्याआधीचा मे महिना तेवढा ठेकेदारांच्या हाती आहे. त्यामुळेच डोंगर कापण्याचे काम जोरात आहे. मात्र, डोंगराच्या लाल मातीचा धुरळा महामार्ग व्यापून राहिला आहे. मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या नाका-तोंडामध्ये हा मातीचा धुरळा जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. डोंगर कापण्याचे काम योग्यरित्या झाले नाही तर पावसाळ्यात महामार्गावर दरडी कोसळण्याची भीती आहे.मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणासाठी डोंगरांची ही माती वापरली जात आहे. ही मातीच रस्त्याच्या दुतर्फा पसरवली जात आहे. झाडे तोडल्यानंतर झाडे लावली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पाऊस जवळ आला तरी अद्यापही रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. मात्र, हटविलेल्या कटिंग्जनंतर डोंगराची माती सैल झाली आहे. पावसाळ्यात हे कापलेले डोंगर पाण्याने फुगून महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वे मार्गावरही प्रकल्प उभारणीच्यावेळी अशीच कटिंग्ज काढण्यात आली होती. त्यानंतरच्या काही वर्षात पावसाळ्यात मार्गालगतच्या डोंगरांच्या दरडी मार्गावर कोसळण्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळे आले. मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असतानाही असाच धोका दरडींपासून दिसून येत आहे. त्यामुळे पावसाने फुगून या दरडी कोसळू नयेत, यासाठी महामार्ग विभाग व ठेकेदारांनी सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी