शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुग्धा पोखरणकर सीईटी परीक्षेत खुल्या गटात मुलींमध्ये प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:28 IST

सीईटी परीक्षेत खुल्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान रत्नकन्या मुग्धा महेश पोखरणकर हिने मिळवला आहे. बारावीच्या परीक्षेतही तिला ९३.३८ टक्के गुण मिळाले असून, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी (पीसीएम) परीक्षा दिली होती. पीसीएममध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला आहे. अभियंता होण्याचे व्दार खुले असतानाही तिला शिक्षक व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया मुग्धा हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देरत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरारत्नकन्या मुग्धा म्हणते, मला शिक्षक व्हायचयं...

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : सीईटी परीक्षेत खुल्या गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान रत्नकन्या मुग्धा महेश पोखरणकर हिने मिळवला आहे. बारावीच्या परीक्षेतही तिला ९३.३८ टक्के गुण मिळाले असून, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी (पीसीएम) परीक्षा दिली होती. पीसीएममध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला आहे. अभियंता होण्याचे व्दार खुले असतानाही तिला शिक्षक व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया मुग्धा हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.मुग्धाचे वडील डॉक्टर असून, गोळप येथे त्यांचा दवाखाना आहे, आई पल्लवी गृहिणी आहे. मुग्धा सुरूवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी असून बालवाडीपासून बारावीपर्यंत तिने अभ्यासातील चुणूक कायम ठेवली आहे. पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती तिने मिळविली असून, विविध शालेय व शालाबाह्य परीक्षेत यश संपादन केले आहे.

दहावीला तर तिने शंभर टक्के गुण मिळविले होते. अकरावीसाठी तिने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बारावीमध्ये ९३.३८ टक्के मिळविले. सीईटी (पीसीएम) ची परीक्षा मुग्धाने दिली होती. तिला पीसीएममध्ये ९९.९९ गुण प्राप्त झाले असून, राज्यात खुल्या प्रवर्गात मुलींच्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.मुग्धा ही बारावीला असताना महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासाचे तासवगळता दररोज सात ते आठ तास अभ्यास करीत असे. अभ्यासाशिवाय तिला वाचनाची आवड आहे. त्यामुळे विविध लेखकांची तिने पुस्तके आतापर्यंत वाचली आहेत. भविष्यात बीएसस्सी, एमएसस्सी करून शिक्षक होण्याची मनीषा आहे. सीईटी परीक्षेतील यशामुळे अभियंता होण्याचा मार्ग खुला झाला असला तरी त्याकडे न वळता तिने बीएस्सीच्या प्रथम वर्गासाठी प्रवेश घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी आई-वडिलांचाही भक्कम पाठिंबा आहे. 

 

नियमित अभ्यासाबरोबरच सीईटीचा अभ्यास केला. अधिक लक्ष बोर्डाच्या परीक्षेवर केंद्रित केले होते. मात्र वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी सीईटी परीक्षा दिली होती. त्यासाठी विविध पेपर सोडविण्याचा सराव केला होता. राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असल्याचा विश्वास पटत नाही परंतु यशाबद्दल खात्री होती. यश मिळाले तरी बीएसस्सी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणार आहे.- मुग्धा महेश पोखरणकर

मुग्धा हुशार आहे. बालवाडीपासून सीईटी परीक्षेपर्यत तिने अभ्यासातील प्रगती कायम ठेवली आहे. बारावी परीक्षेकडे प्राधान्याने लक्ष होते, वेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तिने सीईटी परीक्षा दिली होती. परंतु त्याचवेळी तिने मी शिक्षकच होणार अशी मनिषा व्यक्त केली होती. आम्हा उभयतांना तिच्या यशाची खात्री होती, परंतु तिची शिक्षक होण्याची इच्छा असल्याने आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे.- पल्लवी महेश पोखरणकर, आई.

टॅग्स :Educationशिक्षणRatnagiriरत्नागिरी