चिखल काढण्याचे काम द्रूतगतीने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST2021-07-31T04:32:39+5:302021-07-31T04:32:39+5:30

चिपळूण आणि खेड येथे २७ जेसीबी, २१ डंपर, ६ चिखल उचलणारी मशिन्स आदींच्या सहकार्याने चिखल काढण्याचे तसेच स्वच्छतेचे काम ...

Mud removal work quickly .. | चिखल काढण्याचे काम द्रूतगतीने..

चिखल काढण्याचे काम द्रूतगतीने..

चिपळूण आणि खेड येथे २७ जेसीबी, २१ डंपर, ६ चिखल उचलणारी मशिन्स आदींच्या सहकार्याने चिखल काढण्याचे तसेच स्वच्छतेचे काम सुरू असून, यात मुंबई, धुळे, ठाणे तसेच रत्नागिरीतील अनेक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने स्वच्छतेचे काम केले जात आहे. चिपळूणमधील रस्ते जोरदार पाण्याच्या प्रवाहाने स्वच्छ करण्यात आले आहेत. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंडचा रस्ताही स्वच्छ करून घेतला आहे. कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करण्यात येणार आहे. गटारेही स्वच्छ करण्यात आली आहेत.

स्वतंत्र पाइपलाइनने पाणी पुरवठा...

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा स्वतंत्र पाइपलाइनने सुरू करण्यात आला आहे. पाण्याची चाचणी करण्यात आली असून, १०० टक्के शुद्ध पाणी पुरवठा सुरू झाला आहे, तसेच वीज पुरवठाही १०० टक्के सुरू झाला आहे. वीज नव्हती तिथे डिझेल जनरेटर उपलब्ध करून वीज पुरवठा सुरू केला आहे.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर...

नुकसान झालेले रस्ता, साकव, महामार्ग, शाळा, सार्वजनिक मालमत्ता यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कार्यारंभ आदेशही काढून दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मदत...

या आपत्तीत ३२ जणांचे मृत्यू झाले. काही त्रुटी असलेली एक दोन प्रकरणे वगळता अन्य सर्वच मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखाचा धनादेश देण्यात आला आहे. २० जखमींना प्रत्येकी ७२ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते देण्यात आला.

१६ कुटुंबांचे स्थलांतर...

पोसरे (ता. खेड) येथे दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १६ जणांच्या कुटुंबांचे स्थलांतर या गावातील प्राथमिक शाळेत करण्यात आले असून, त्यांना शेगडीसह अन्य वस्तुंची मदत करून त्यांचे संसार सुरू करून देण्यात आले आहेत.

अनाथ बालकाच्या मदतीसाठी आवाहन

या गावातील सुमारे दहा वर्षाचे बालक अनाथ झाले आहे. त्याच्या पालनपोषणासाठी अथवा शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेण्यासाठी समाजातून पुढे येण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Mud removal work quickly ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.