महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:30 IST2021-03-28T04:30:10+5:302021-03-28T04:30:10+5:30
राजापूर महावितरण उपविभाग २ अंतर्गत येणाऱ्या मंदरूळ तिवंदामाळ येथील राजेश पवार यांचे सुमारे २१ हजार रुपयांचे वीजबिल थकल्याने या ...

महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण, एकावर गुन्हा दाखल
राजापूर महावितरण उपविभाग २ अंतर्गत येणाऱ्या मंदरूळ तिवंदामाळ येथील राजेश पवार यांचे सुमारे २१ हजार रुपयांचे वीजबिल थकल्याने या विभागाचे रोहित कुलकर्णी हे शनिवारी दुपारी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह पवार यांच्या घरी वीजजोडणी तोडण्यासाठी गेले होते.
यावेळी राजेश पवार यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत कुलकर्णी यांना मारहाण केली, अशी तक्रार राजापूर पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली.
या प्रकरणी कुलकर्णी यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांत सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची ही दुसरी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर एका पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.