शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सुसाट; पण पावसाळ्यात धोका कायम

By संदीप बांद्रे | Updated: May 4, 2024 15:57 IST

धोकादायक दरडींच्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता

संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. आता घाटातून प्रवास करताना वाहनांचा वेगही वाढला आहे; मात्र अजूनही घाटातील दरड प्रणव क्षेत्रात धोका टळलेला नाही. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही अजून अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटातील सुरक्षितता समाेर येणार आहे.महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटातील काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले. चौपदरीकरणातील जमिनीच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता; मात्र त्यानंतर अत्यंत घाईघाईने काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे परिणाम मागील वर्षी पहिल्याच पावसात दिसले. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचा भाग खचला हाेता. विशेषतः घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरणाचे काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले.या घाटातील अतिशय अवघड टप्पा चिपळूण हद्दीत, उर्वरित भाग महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत येतो. महाड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीकडून सुरू असलेल्या कामावर अखेरचा हात फिरवला असला, तरी त्या ठिकाणी अजूनही किरकोळ स्वरूपाची कामे शिल्लक आहेत; मात्र चिपळूण हद्दीत काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असले, तरी या ठिकाणी दरडीची उंची अधिक असल्याने तेथे पायरी पद्धतीने रचना करण्याची मागणी केली जात आहे.तूर्तास दरडीचा धोकाही कायम आहे; मात्र आता संबंधित कंपनीने चिपळुणातील यंत्रणा संगमेश्वर हद्दीतील कामात गुंतल्याने परशुराम घाटातील कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाच्या उपाययोजना न केल्यास यावर्षीही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार आहे; तसेच पायथ्यालागतच्या घरांचाही धोका टळलेला नाही. आता दोन्ही मार्गांवर वाहतूक सुसाट सुरू झाली असली, तरी दरडीची उंची लक्षात घेता दोन्ही मार्गांवरील धोका टळल्याची खात्री अजून तरी ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेली नाही.

अजूनही महाड हद्दीत किरकोळ काम शिल्लक असून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल; मात्र दरडीचे टप्पे तयार करण्यासाठी जागा अपुरी आहे. त्यामुळे काम थांबले आहे. मात्र, त्या ठिकाणची गटारातील माती व अन्य साफसफाई तातडीने केली जाणार आहे. - आर. पी. कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग