शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:39 IST

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ...

रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. यावर्षी लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त असले तरी मे महिन्यात अवघे दोनच मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत तर जुलैमध्ये काही मुहूर्तच नाहीत. त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्यांना घाई करावी लागणार आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे अधिकाधिक मुहूर्तावर लग्नगाठ बांधण्यासाठी घाई करावी लागणार आहे.वास्तविक दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या दिवसात मे महिन्यातील १ व २ तारखेला मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनच्या २९ व ३० तारखेलाच मुहूर्त आहेत. मे महिन्यात पाण्याची भासणारी टंचाई यामुळे सुटीतील मुहूर्तापेक्षा लवकरचा मुहूर्त शोधला जात आहे. शहरात तर सभागृहाच्या उपलब्धतेवर मुहूर्त ठरत आहे. सोमवारपासून विवाह मुहूर्त सुरू होत असून, हिवाळ्यात ३८ मुहूर्त तर उन्हाळ्यात २८ मुहूर्त आहेत.

असे आहेत विवाह मुहूर्तनोव्हेंबर - २७, २८, २९डिसेंबर - ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१जानेवारी - २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१फेब्रुवारी - १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९मार्च - ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०एप्रिल - १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८मे - १, २जून - २९, ३०जुलै - ९, ११, १२, १३, १४, १५

यावर्षी एकूण ६६ विवाह मुहूर्त आहेत

  • हिवाळ्यामध्ये ३८ मुहूर्त आहेत.
  • उन्हाळ्यात २८ विवाह मुहूर्त आहेत.
  • मे महिन्याच्या सुरुवातीला दोन तर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत.

मुलींपेक्षा मुलांच्या विवाहाची अधिक चिंता

  • मुलींच्या वाढत्या जन्मदरामुळे मुलींपेक्षा आता मुलांच्याच विवाहाची चिंता मुलांच्या कुटुंबांमध्ये वाढली आहे. तुलनेने मुलांची संख्या मुलींपेक्षा कमी आहे.
  • शिक्षणाचा टक्का मुलींमध्येही वाढला आहे. त्यामुळे शिक्षणातील बरोबरी/ त्यापेक्षा अधिक शोधली जाते. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • शिक्षणाबरोबर शहरी भागातील मुलांना पसंती असल्याने ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नाचे वय निघून जात आहे.
  • याेग्य जोडीदार न मिळाल्याने मुलांचे लग्नाचे वय निघून जाते. त्यामुळे येणाऱ्या नैराश्यातून युवक व्यवसनाधीन होत चालल्याने नवी समस्या उभी राहिली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच मुहूर्त अधिक आहेत. यावर्षीच्या विवाह मुहूर्तामध्ये गुरू, शुक्राचा अस्त नसल्यामुळे प्रत्येक महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. मात्र, तरीही गुरुबल व चंद्रबल पाहूनच विवाहाच्या तारखा ठरविल्या जात आहेत. सध्या हिवाळ्यातील विवाह मुहूर्त ठरविण्याकडे यजमान मंडळींचा कल वाढला आहे. - अजय जोशी, पुराेहित

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्न