ऑक्सिजन पुरवठा आणि कोविड सेेंटर यावर अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:17+5:302021-04-25T04:31:17+5:30
त्याचबरोबर ऑक्सिजन बेडची कमतरता लक्षात घेऊन हे बेड मोठ्या प्रमाणावर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दिवसेंदिवस पाचशे ते साडेपाचशे ...

ऑक्सिजन पुरवठा आणि कोविड सेेंटर यावर अधिक भर
त्याचबरोबर ऑक्सिजन बेडची कमतरता लक्षात घेऊन हे बेड मोठ्या प्रमाणावर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दिवसेंदिवस पाचशे ते साडेपाचशे अशी रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यादृष्टीने जिल्हा शासकीय रुग्णालयात ६० बेड वाढविण्यात आले आहेत. सध्या जिल्हा महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. त्यामुळे या रुग्णालयात १६० बेड उपलब्ध करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कामथेत ६०, दापोली ४०, कळंबणी ५०, घरडा ७०, परशुराम, दापोलीतील कृषी भवन येथील सीसीसीमध्येही बेड वाढविण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयात एक कोटी रुपये खर्चातून १७० जम्बो सिलिंडरची क्षमता असलेल्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाली आहे. संभाव्य गंभीर परिस्थितीचा विचार करता जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन बेड वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रासाठी विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे टॅंकर पाठविण्यात आले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश असल्याने राज्याकडूनही पुरवठा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाढती मागणी असली तरी जिल्हा प्रशासनाकडे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा राहील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
चौकट
सध्या संसर्ग वाढता असला तरीही सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करताना अनावश्यक रुग्णांसाठी तो केला जाणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याकडे लक्ष देणार असून, त्यासाठी ऑडिट करण्यात येणार आहे.
कंपन्यांकडून सिलिंडर ताब्यात
जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांकडून ड्युरासाठी वापरण्यात येणारे ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडरही ताब्यात घेण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे संभाव्य गंभीर परिस्थितीचा विचार करता जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.