कोविड सेंटरवर अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:06+5:302021-04-25T04:31:06+5:30

खेड : शासकीय तसेच खासगी कोविड सेंटर, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत आढावा घेतानाच आमदार योगेश कदम ...

More emphasis on the Covid Center | कोविड सेंटरवर अधिक भर

कोविड सेंटरवर अधिक भर

खेड : शासकीय तसेच खासगी कोविड सेंटर, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत आढावा घेतानाच आमदार योगेश कदम यांनी आरोग्यविषयक साहित्य खरेदीसाठी विशेषत: ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीसाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये देऊ केले आहेत. स्वत: आजारी असतानाही ते लोकांची काळजी घेण्याकडे विशेष लक्ष देत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या महिन्यापासून सतत वाढत चालला असून, एप्रिल महिन्यात दापोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खेड, मंडणगड व दापोली या तिन्ही तालुक्यांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णांच्या रोजच्या वाढत्या संख्येमुळे तिन्ही तालुक्यांतील बेडची सुविधा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच लवेल, दापोली व मंडणगड येथील शासकीय कोविड केअर सेंटर पुन्हा चालू करण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला होता. दापोली, खेड व मंडणगड येथील तिन्ही कोविड केअर सेंटर्स या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात यश मिळवले.

मार्च महिन्यात २२ रोजी आमदार योगेश कदम यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला आणि तेही स्वतः पॉझिटिव्ह आल्याने मतदारसंघात प्रत्यक्ष भेटीगाठी बंद कराव्या लागल्या. मात्र गेल्या पंधरा दिवसांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही आमदार कदम यांनी कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्याशी संपर्क ठेवून मतदारसंघातील अडचणी समजून घेतल्या आणि आवश्यक तेव्हा प्रशासनासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला व सूचना दिल्या.

बेकायदेशीर कोविड सेंटरप्रकरणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार एसएमएस हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे मागणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली होती. खेड व दापोली तालुक्यात गत आठवड्यात कोरोनाचा उद्रेक होऊन रुग्णांची संख्या मर्यादेपेक्षा वाढली आणि उपचारासाठी बेड्सची संख्या अपुरी पडल्यामुळे त्यांनी आपल्या शिवतेज आरोग्य संस्थेची शहरातील इमारत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या सुसज्ज इमारतीत सद्य:स्थितीत १०० बेड्सची व्यवस्था उभारण्यात आली आहे. या कोविड सेंटर करीत लागणारे बेड, सॅनिटायझर आदी साहित्य स्वतः उपलब्ध करून दिले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणखी एका सुसज्ज कोविड केअर सेंटरची गरज दापोली मतदारसंघात जाणवत होती ही गरज आमदार कदम यांनी स्वखर्चातून पूर्ण केली आहे.

स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कोविड सेंटरच्या उपलब्धतेसाठी सतत प्रशासनाच्या संपर्कात राहून केवळ दहा दिवसांत कोविड सेंटर जनतेच्या सेवेत दाखल करण्यात योगेश कदम यांना यश मिळाले आहे. दापोली मतदारसंघातील रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून आमदार निधीतून ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर या हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ५० उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या संसर्गातून बाहेर पडताच आमदार कदम यांनी तातडीने मतदारसंघ गाठून सर्व कोविड केअर सेंटर्सची पाहणी करून अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संकटकाळात मतदारसंघातील जनतेच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समस्या सोडविण्यासाठी दिवसरात्र दौरे सुरू केले आहेत.

--

मतदारसंघातील जनतेने राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करावी. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व या संसर्गापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा. शिवसेना व शिवसैनिक सर्व प्रकारची मदत करण्यास तत्पर असून, कोणत्याही मदतीसाठी कोणीही माझ्याशी संपर्क साधावा.

योगेश कदम, आमदार, खेड, दापोली, मंडणगड

Web Title: More emphasis on the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.