शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Ratnagiri: दाभोळ खाडीत पर्यटनप्रेमीचे जीवदीप्तीचे निरीक्षण सुरू, समुद्रातील निळ्या लाटांच्या कुतुहलाचा होणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 17:57 IST

मंदार गोयथळे शृंगारतळी : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी ...

मंदार गोयथळेशृंगारतळी : गोव्यातील समुद्रात सर्रास निरीक्षण केले जाणाऱ्या जीवदीप्तीचे निरीक्षण जवळजवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी कोकणातील दाभोळ खाडीत करण्यात आले. हे निरीक्षण परचुरी येथील पर्यटन व्यावसायिक व पर्यटनप्रेमी सत्यवान देर्देकर यांनी केले आहे.गुहागर तालुक्यातील परचुरी येथे सत्यवान देर्देकर हे गेली अनेक वर्षे पर्यटन व्यवसाय करतात. दाभोळ खाडीत केल्या जाणाऱ्या मगर सफरसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. गोव्याच्या समुद्रामध्ये जीवदीप्तीचे निरीक्षण केले जाते. कोकणात अशी जीवदीप्ती अनेक वेळा दिसते मात्र तिचे निरीक्षण होत नाही.जीवदीप्तीमान सजीवांच्या पेशीत ल्युसिफेरीन वर्गातील रसायने आणि ल्युसिफरेज (विकर) ही रसायने तयार होतात. ल्युसिफेरीनचा ऑक्सिजनाशी संयोग घडून आल्यामुळे प्रकाशनिर्मिती होते. या क्रियेत ल्युसिफरेज विकर उत्प्रेरकाची भूमिका बजावते. काही वेळा कॅल्शियमची आयने किंवा एटीपीचे रेणू या क्रियेत भाग घेतात. वेगवेगळ्या सजीवांमध्ये आढळणारे ल्युसिफेरिन वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्यापासून बाहेर पडणारा प्रकाश वेगवेगळ्या तरंगलांबीचा, निळसर ते लाल असतो. हा प्रकाश ‘शीत’ प्रकारचा असतो. या अभिक्रियेत मुक्त झालेली ८० टक्के ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते तर उर्वरित सु. २० टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते.फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम जातीच्या जीवाणूंच्या वृद्धीमिश्रणातून उत्सर्जित झालेला प्रकाश काही मीटर दूर असलेली वस्तू झळाळून टाकते. अनेक सागरी प्राणी जसे आंतरदेहगुही, कृमी, मृदुकाय, कंटकचर्मी मासे आणि जीवाणूंमध्ये सहजीवन आढळून येते. हे जीवाणू जीवदीप्तीकारक असतात. त्याबाबतचा अभ्यासही यातून केला जाणार आहे.

जोडीदार शोधण्यासाठी..सागरी वलयी प्राण्यांमध्ये मादी पाण्याच्या पृष्ठभागावर येते आणि प्रकाशमान होते. हा प्रकाश पाहून खोल पाण्यातील नर पृष्ठभागावर येऊन मादीबरोबर प्रणय करतो. नंतर दोघेही पाण्यात प्रजननपेशी सोडतात. काही जीवदीप्तीमान खेकडे मिलनासाठी जोडीदार शोधण्यासाठी जीवदीप्तीचा वापर करतात. त्या प्रकाशामुळे समुद्रातील लाटा निळसर दिसू लागतात. पर्यटकांसाठी हे मोठे आकर्षण असते.

दाभोळ खाडीत जीवदीप्ती अनेक वेळा दिसते. मात्र, मच्छिमार यांनी त्याचे कधी निरीक्षण केले नसावे. आमच्या नवीन बोटीचे काम सुरू असताना आर्किटेक्ट रोहन मेंगले यांना परचुरी बंदरावरून ही जीवदीप्ती दिसली. त्यांनी याबाबत माहिती दिल्यावर या जीवदीप्तीचे निरीक्षण गतवर्षी पहिल्यांदा केले होते. यावर्षी पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा हे निरीक्षण आपण केले. - सत्यवान देर्देकर, पर्यटन व्यावसायिक, परचुरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गResearchसंशोधन