राजापूर आठवडा बाजारात मोकाट गुरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST2021-04-06T04:30:53+5:302021-04-06T04:30:53+5:30

राजापूर : शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारात मोकाट जनावरे फिरत असल्याने विक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेल्या लोकांनाही त्रास सहन करावा लागत ...

Mokat cattle throng in Rajapur weekly market | राजापूर आठवडा बाजारात मोकाट गुरांचा धुमाकूळ

राजापूर आठवडा बाजारात मोकाट गुरांचा धुमाकूळ

राजापूर : शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारात मोकाट जनावरे फिरत असल्याने विक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेल्या लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी भरलेल्या आठवडा बाजारामध्ये एक महिला व एका मुलीला जनावरांनी धडक दिल्याने त्या दोघीही एका महिला भाजीविक्रेत्यांच्या अंगावर पडल्याची घटना घडली असल्याने संताप व्यक्त केला आहे.

शहरातील गणेशघाट परीसरातील शिवाजीपथावर दर गुरुवारी आठवडा बाजार भरत आहे. तालुक्याच्या ठिकाणी हा आठवडा बाजार असल्याने तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. मुळातच रस्त्याचा बाजूला हा आठवडा बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामध्ये गुरुवारी भरलेल्या आठवडा बाजारात मोकाट गुरांनी धुडगूस घातला होता. भाजीविक्रेत्यांची संख्या मोठी असल्याने जिकडे तिकडे या मोकाट जनावरांना ओला चारा दिसत होता. तो खाण्यासाठी संपूर्ण बाजारभर ही गुरे फिरत होती.

भाजी खाऊ नये म्हणून विक्रेते तर ती अंगावर येऊ नयेत म्हणून ग्राहक त्यांना इकडून तिकडे हाकलत होते. त्यामुळे गुरे अक्षरश: बाजारात धावतच होती. या दरम्यान एक महिला व मुलीला गुरांचा धक्का बसल्याने त्या भाजीविक्रेत्यावर पडल्या. यामुळे त्यांच्यामध्ये भांडण झाले. नगर परिषद आठवडा बाजारातील विक्रेत्यांकडून कर आकारत आहेत. मात्र तेथील सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत.

Web Title: Mokat cattle throng in Rajapur weekly market