शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार फार काळ टिकणार नाही!, आमदार भास्कर जाधव यांचा दावा

By संदीप बांद्रे | Updated: June 12, 2024 17:57 IST

''भाजपचे सरकार सत्ताधीश नव्हे, सत्ताचीट झाले आहे''

चिपळूण : भाजपचे सरकार सत्ताधीश नव्हे, सत्ताचीट झाले आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपला अपेक्षीत यश मिळाले नाही. या निवडणूकीत डोक्यात हवा गेलेल्यांना देशातील मतदारांनी जागेवर आणलं आहे. लोकशाहीत जनता हीच सर्वोच्च आहे. जे जनतेला विसरतता ते फार काळ टिकत नाहीत. केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला. गुहागर विभानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते.रायगड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना गुहागर मतदार संघातून २७  हजाराचे मताधिक्य मिळाले. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याचे आभार आणि नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याच्या हेतूने आमदार भास्कर जाधव यांनी शहरातील बांदल हायस्कूल येथे कार्यकर्ता मेळावा आज, बुधवारी आयोजित केला होता. मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार जाधव म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरले नसते, तर त्यांचे ४ देखील खासदार आले नसते. यावेळच्या लोकसभा निवडणूकीत आपण १८ मतदार संघात प्रचार केला. तेथे महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. गतवेळी विजयी झालेल्या जागा या निवडणूकीत सोडाव्या लागल्या ही पक्षाची चूक झाली. गुहागर मतदार संघात आपण प्रचाराचे योग्य नियोजन केले होते. प्रचासाठी आवश्यक साधनसामुग्री मिळाली नाही, कार्यकर्त्याना बळ दिले नाही. आपण मतदार संघात केवळ चारच सभा घेतल्या, तरिदेखील अनंत गितेंना २७ हजार ७००चे मताधिक्य मिळाले. कार्यकर्त्यानी मोठे मताधिक्य देऊन माझी ईज्जत वाचवल्याचे जाधवांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूकीबाबत ते म्हणाले की, राज्यातील ६० आमदारांच्या मतदार संघाची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपवली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढण्यासाठी आपण आपले कौशल्य पणाला लावणार आहे. तर गुहागर मतदार संघात आपल्या विरोधी कोण उमेदवार असेल असे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम आणि बौद्ध समाज एकमताने महाविकास आघाडी सोबत राहिल्यानेही मोठे मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात नवनिर्वाचीत जिल्हाप्रमुख संजय कदम, प्रभाकर जाधव, जितेंद्र चव्हाण, प्रभाकर कदम यांचा सत्कार करण्यात आला. तर पक्षाने आमदार जाधव यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. मेळाव्यास गुहागर व खेडचे तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.विक्रांत जाधव यांना गुहागर मतदारसंघातून उमेदवारी द्यागुहागर मतदार संघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव सातत्याने संपर्कात आहेत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य देखील मजबूत आहे. त्यामुळे पक्षांने त्यांना गुहागर मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूकीत या मतदार संघातून ५० हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धारही कार्यकर्त्यानी व्यक्त केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarendra Modiनरेंद्र मोदीBhaskar Jadhavभास्कर जाधव