देवरूख येथे अंगणवाडीसेविकांकडून मोबाइल वापसी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:55+5:302021-09-02T05:07:55+5:30
देवरूख : पंचायत समिती येथे संगमेश्वर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे मोबाइल वापसी आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे ३७४ मोबाइल ...

देवरूख येथे अंगणवाडीसेविकांकडून मोबाइल वापसी आंदोलन
देवरूख : पंचायत समिती येथे संगमेश्वर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे मोबाइल वापसी आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे ३७४ मोबाइल एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
‘हम सब एक है, हमारी युनियन हमारी ताकत, अंगणवाडी कर्मचारी सभेचा विजय असो, अंगणवाडी कृती समितीचा विजय असो, नवीन मोबाइल मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या तालुकाध्यक्ष प्रणिता केतकर यांनी केले. संगमेश्वर तालुक्यात अंगणवाडी ११ बीट आहेत. या सर्व बिटांमधील ३७४ मोबाइल एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना यादव यांच्याकडे देण्यात आले.
तालुक्यातील बुरंबी बीटमधून २९, कडवई ३७, साखरपा ३७, माखजन ४५, फुणगूस २५, वांद्री ३१, देवळे ३३, नायरी २६, धामापूर ४५, सायले २९, निवे खुर्द ३४ असे एकूण ३७४ मोबाइल परत करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी सभेमार्फत गोळा करण्यात हे मोबाइल अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, जोपर्यंत मोबाइल स्वीकारत नाही तोपर्यंत अंगणवाडीसेविका संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत अखेर मोबाइल ताब्यात घेतले.