शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मला तुमची साथ हवी आहे", राज ठाकरेंचा 'एकला चलो’चा नारा', जनतेला केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 19:58 IST

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील जनता त्यांचा राग व्यक्त करते का, की पुन्हा पैशांच्या तमाशावर विकली जातेय. पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी होणार असतील अन् तुम्ही त्यांनाच मतदान करत असाल तर त्याला काही अर्थ नाही, असे राज यांनी सांगितले.

तसेच राज्यात जे काही चालले आहे ते पाहून आनंद वाटत असेल तर भोगा. मी राज ठाकरे सतत जे सांगतोय हे फक्त वर्तमानापुरतेच  नाही तर भविष्यात येणाऱ्या पिढ्या काय पाहणार आहेत याचा विचार करा. जो या सगळ्या लोकांनी चिखल केला त्यात सर्वांना घालायचं की नवनिर्माण करायचं याचा विचार जनतेने करायला हवा. याबद्दल मला जे काही जनतेशी बोलायचं आहे ते मी बोलेनच, असेही त्यांनी म्हटले.

राज ठाकरेंचा 'एकला चलो’चा नारा"मला तुमची साथ हवी आहे, ऐन मोक्याच्या वेळी सर्वांची साथ हवीय. मला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत झालं ते झालं आता नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. कोणाच्या युत्या नको तसल्या भानगडीच नकोत. खेडमध्ये नगरपरिषदेत निश्चितच खेडमधील जनता आपल्याला निवडून देईल", असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. 

कोकणातील रस्ते का रखडले - राज मनाला प्रश्न विचारा की आमच्या कोकणातला रस्ता १७ वर्ष झाली तरी पूर्ण का होत नाही. समृद्धी महामार्ग फक्त चार वर्षांत पूर्ण झाला. मागच्या वेळी आलो तेव्हा नितीन गडकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत. हे ऐकल्यावर तुम्ही हसू नका गांभीर्याने विचार करा. समोरचे खड्डे पाहून आपण जे काही भोगतो आणि पुन्हा त्यांनाच निवडून देतो. आज ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली त्यांची लवकरच कार्यशाळा घेतली जाईल. ज्या चौकटी आखून देईन तसेच काम करा. कोकणवासियांना काहीतरी वेगळे देण्यासाठी मी तुमच्या मनगटात ताकद देण्याचा प्रयत्न करतो आहे, असे राज ठाकरेंनी नमूद केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेRatnagiriरत्नागिरीKhedखेड