मनसे नेत्यांकडून पूरग्रस्त खेडमध्ये पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST2021-07-31T04:31:45+5:302021-07-31T04:31:45+5:30

खेड : मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी खेड शहरातील पूरग्रस्त बाजारपेठ परिसराला ...

MNS leaders inspect flood-hit Khed | मनसे नेत्यांकडून पूरग्रस्त खेडमध्ये पाहणी

मनसे नेत्यांकडून पूरग्रस्त खेडमध्ये पाहणी

खेड : मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी खेड शहरातील पूरग्रस्त बाजारपेठ परिसराला भेट दिली व पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना अधिक मदत पाठवण्याचे आश्वासनदेखील दिले.

खेड शहरातील पानगल्ली, पाैत्रिक मोहल्ला, सफा मशीद चौक या भागात मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू, सामग्री खेड येथे पाठवण्यात येईल, असे आश्वासनदेखील दिले. यावेळी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भूषण चिखले उपस्थित होते.

--------------------------

खेड शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांसोबत मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई व शिरीष सावंत यांनी चर्चा केली.

Web Title: MNS leaders inspect flood-hit Khed