मनसेतर्फे पत्रकारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST2021-07-12T04:20:24+5:302021-07-12T04:20:24+5:30

असगोली : गुहागर तालुका मनसेतर्फे गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्कवाटप करण्यात आले. तसेच सर्व पत्रकारांना कोविडयोद्धा ...

MNS felicitates journalists | मनसेतर्फे पत्रकारांचा सत्कार

मनसेतर्फे पत्रकारांचा सत्कार

असगोली : गुहागर तालुका मनसेतर्फे गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्कवाटप करण्यात आले. तसेच सर्व पत्रकारांना कोविडयोद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विश्वास मुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, ज्येष्ठ व्यावसायिक महाराष्ट्र सैनिक प्रमोद सीताराम गांधी त्यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, अध्यक्ष विनोद जानवलकर, तेजस पोफळे, वैभवी जानवळकर, स्वप्निल कांबळे, संजय भुवड, मयूरी शिगवन, रुपेश घवाले, दिनेश निवाते, नितीन कारकर, ऋतिक गावणकर, वनिता निवाते, संकेत खांबे कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

Web Title: MNS felicitates journalists