शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात, विनायक राऊतांचा गौप्यस्फोट

By मनोज मुळ्ये | Updated: July 6, 2023 14:17 IST

मंत्रिपदावर डोळा ठेवून शिंदे गटातील अनेकांनी नवीन कपडे शिवले. मात्र..

रत्नागिरी : राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आठ ते दहा आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी रत्नागिरीत केला. गद्दारांना परत घेऊ नये, अशी अनेकांची भावना आहे. त्यांच्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.रत्नागिरी दौर्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांवरच टीकेचा भडिमार केला. सध्याच्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. इतके गलिच्छ राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे. जे सुरू आहे, ते किळसवाणे आहे, असे ते म्हणाले.ज्या दिवशी राष्ट्रवादीतील आमदारांनी भाजपमध्ये उडी मारली, तेव्हाच शिंदे गटातील आमदारांनी उडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. पश्चित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून आठ ते दहा आमदारांनी परत येण्यासाठी थेट संपर्क केला आहे. गद्दारांना परत घेऊ नये, अशी पदाधिकार्यांची भावना आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे ते म्हणाले.मंत्रिपदावर डोळा ठेवून शिंदे गटातील अनेकांनी नवीन कपडे शिवले होते. मात्र त्यांना कळले आहे की आपली वर्णी लागणार नाही. त्यामुळे काही आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगावरही धावून गेले असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ९ जुलैपासून त्यांचा दौरा सुरू होईल. यवतमाळला पोहरादेवीचे दर्शन घेऊन ते दौरा सुरू करतील. पहिले दोन दिवस यवतमाळ, अमरावती, नागपूर असा त्यांचा दौरा असेल. १३ व १४ जुलैला ते हिंगोली आणि परभणीचा दौरा करतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMLAआमदार