आमदार राजन साळवी यांना मोठा दिलासा; पत्नी, मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर 

By मनोज मुळ्ये | Published: February 13, 2024 01:56 PM2024-02-13T13:56:37+5:302024-02-13T13:56:56+5:30

रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल असलेल्या आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व ...

MLA Rajan Salvi wife, son granted pre arrest bail | आमदार राजन साळवी यांना मोठा दिलासा; पत्नी, मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर 

आमदार राजन साळवी यांना मोठा दिलासा; पत्नी, मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर 

रत्नागिरी : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल असलेल्या आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

रायगड लाचलुचपत खात्याकडून आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आली. त्यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा, मुलगा शुभम, भाऊ दीपक, पुतण्याचीही चौकशी करण्यात आली. जवळपास सव्वा दीड वर्ष झालेल्या चौकशीदरम्यान, त्यांच्या घराची, सामानाची मोजदादही करण्यात आली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी आमदार साळवी, पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून या तिघांवरही अटकेची टांगती तलवार होती.

राजकारणात असल्यामुळे आपण अशा प्रसंगांना तोंड देण्यास समर्थ आहोत. मात्र आपली पत्नी आणि मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणे, ही बाब आपल्याला खूप लागली असल्याची प्रतिक्रिया आमदार साळवी यांनी दिली हाेती. त्यासाठी त्यांनी या दोघांच्या अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू केले होते. या अर्जावरील सुनावणीनंतर सोमवारी (१२ फेब्रुवारी) उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी अनुजा आणि शुभम या दोघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामीनामुळे आमदार साळवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: MLA Rajan Salvi wife, son granted pre arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.