शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवी लाचलुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर, समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोर्चा

By मनोज मुळ्ये | Updated: January 22, 2024 15:32 IST

कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले

रत्नागिरी : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांना भावासह साेमवारी रत्नागिरीतील कार्यालयात चाैकशीसाठी हजर राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती. साेमवारी ते कार्यालयात हजर हाेण्यासाठी निघताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली हाेती. यावेळी या कारवाईचा निषेध करणारे फलक झळकवण्यात आले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता.रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर हाेण्यापूर्वी आमदार साळवी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले हाेते. आमदार साळवी चाैकशीसाठी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते व पदाधिकारीही खासदार राऊत यांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांसमवेतच आमदार साळवी आणि त्यांचे भाऊ दीपक प्रभाकर साळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.

कार्यकर्त्यांनी आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राऊत यांचे संपर्क कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय असा कार्यकर्त्यांनी जणू माेर्चाच काढला हाेता. कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करून या कारवाईचा निषेध केला. घोषणाबाजी होत असतानाच आमदार साळवी दाेन्ही भाऊ दीपक साळवी आणि संजय साळवी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दाखल झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग