शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवी 'एसीबी'विरोधात न्यायालयात दाद मागणार

By मनोज मुळ्ये | Updated: February 14, 2024 16:03 IST

पत्नी, मुलाच्या जामीनामुळे समाधानी, ‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नी घरी आल्याने साळवींना आनंद

रत्नागिरी : कोणीतरी माझ्याविरोधात एका कागदावर अर्ज लिहून दिला आणि त्याची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्याविरोधात चौकशी सुरू केली. माझ्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली. मला हा त्रास जाणीवपूर्वक देण्यात आला आहे. मी आणि माझ्या कुटुंबावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आपण याविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे उद्गार ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी काढले.आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरोधात १८ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आमदार साळवी यांनी आपली पत्नी आणि मुलग्याच्या अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. तेथे तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. ते मंजूर होऊन अनुजा साळवी आणि शुभम साळवी यांना अटकपूर्व जामीन मिळाला.बुधवारी याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार साळवी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला आव्हान देणार असल्याचे सांगितले. आपण याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत. उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात आपण या कारवाईविरोधात दाद मागणार असल्याचे ते म्हणाले. आपण राजकारणात आहोत. अशा पद्धतीची राजकीय कारवाई आपल्याला नवीन नाही. मात्र आपले कुटुंब, पत्नी आणि मुलाला यामध्ये ओढण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी सांगितले.कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचा असो किंवा शिंदे गटाचा, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विनायक राऊतच विजयाची हॅटट्रीक करतील, असे त्यांनी सांगितले.‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नी घरीगुन्हा दाखल झाल्यापासून गेले २२ दिवस आपली पत्नी घराबाहेर होती. अंतरिम जामीन मिळाल्यामुळे ती बुधवारी व्हॅलेंटाईन डेला घरी परत आली. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, असेही ते आवर्जून म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालय