आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण..

By अरुण आडिवरेकर | Published: February 29, 2024 06:48 PM2024-02-29T18:48:44+5:302024-02-29T19:08:56+5:30

रत्नागिरी : राज्यातील राजकीय गणित विस्कटलेली असल्याने हल्ली काेणी काेणाला भेटले की साऱ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. आमदार राजन साळवी ...

MLA Rajan Salvi met Deputy Chief Minister Ajit Pawar | आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण..

आमदार राजन साळवींनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, चर्चा रंगल्या; पण..

रत्नागिरी : राज्यातील राजकीय गणित विस्कटलेली असल्याने हल्ली काेणी काेणाला भेटले की साऱ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने आमदार साळवी उपमुख्यंत्री पवार यांच्या भेटीला का गेले याबाबत अधिवेशन काळातच चर्चा रंगली. मात्र, ही भेट जयगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनाबाबत असल्याचे कळताच भेटीची चर्चा थंडावली.

जयगड (ता. रत्नागिरी) येथील किल्ल्याचा बुरुज आणि तटाला या भागात हाेणाऱ्या कंपनीच्या ड्रेझिंगमुळे तडे गेले आहेत. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेऊन तहसीलदार तसेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या पाहणी तटाला व बुरुजाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनीही जयगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत त्यांनी किल्ल्याच्या दुरावस्थेबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडू असे सांगितले.

अधिवेशन काळात आमदार राजन साळवी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गेले आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आमदार साळवी नेमके कशासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला गेले याची चर्चा रंगू लागली. आमदार साळवी दालनातून बाहेर येईपर्यंत तर्कवितर्क लढविले जात हाेते. बऱ्याच वेळाने आमदार साळवी दालनाबाहेर आले आणि त्यांनी जयगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी ही भेट घेतल्याचे समाेर आले. त्यानंतर रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Web Title: MLA Rajan Salvi met Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.