शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

आमदार किरण सामंत यांनी बदलला राजापूरचा मूड, सर्व पंचायत समिती गणात मिळवले मताधिक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:01 IST

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामुळे उद्धवसेनेने नेहमीच चर्चेत ठेवलेल्या देवाचेगोठणे गणातही घेतली आघाडी  

राजापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघात विजयी झालेल्या आमदार किरण सामंत यांनी राजापूर तालुक्यातून ७,९६९ मतांची आघाडी घेऊन राजापूर तालुक्याचा मूड बदलला असल्याचे सिद्ध केले आहे. महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार राजन साळवी यांना साखरीनाटे आणि सागवे पंचायत समिती गणात नाममात्र आघाडी घेता आली. महायुतीचे विजयी उमेदवार आमदार किरण सामंत यांनी राजापूर शहरासह उर्वरित सर्व पंचायत समिती गणांत चांगले मताधिक्य घेऊन राजापूर तालुका महायुतीसमवेत असल्याचे दाखवून दिले आहे.मे महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना तब्बल २३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राजापूर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या मागे उभा राहील, अशी सुरूवातीची लक्षणे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने पुरतीच बाजू पलटवली आणि दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत राजापूर तालुक्यातून सामंत यांना ७,९६९ मतांची आघाडी मिळाली.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राजापूर शहरात ७२० मतांची आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी भरून काढत किरण सामंत यांनी ११७ मतांची आघाडी घेतली.राजापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती गणांपैकी दोन साखरीनाटे गणांत ४६ मतांची, तर सागवे पं. स. गणात ८८ मतांची आघाडी मिळाली. किरण सामंत यांना सर्वाधिक आघाडी ओणी पंचायत समिती गणात मिळाली आहे. या गणात सामंत यांना तब्बल १,६७५ मतांची आघाडी मिळाली. अणसुरे गणात सामंत यांना तब्बल १,४९७ मताधिक्य मिळाले.रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामुळे उद्धवसेनेने नेहमीच चर्चेत ठेवलेल्या देवाचेगोठणे गणातही सामंत यांनी १६० मतांची आघाडी घेतली. भालावली गणामध्ये सामंत यांनी ७६५, कोदवली गणात ७१४, कोंड्ये तर्फ सौदळ गणात ९९०, केळवली गणामध्ये ७१३, ताम्हाणेत ६३७, पाचल गणात ३९१, ओझर गणात ४४४ मताधिक्य मिळवले.काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजापूर शहरातील नऊ मतदान केंद्रांतून महाविकास आघाडीला ७२० मतांची आघाडी होती. यावेळी ही आघाडी भेदून किरण सामंत यांनी ११७ मतांची आघाडी घेतल्याने शहराचे राजकीय चित्रही बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४rajapur-acराजापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेnanar refinery projectनाणार प्रकल्पthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024