शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाणीचा गुन्हा, नेमका वाद काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:22 IST

कंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या वादाचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील विजय केमिकल कंपनीच्या परिसरात शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह सुमित शिंदे, विवेक आंब्रे आणि काही अनोळखी व्यक्तींवर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार (६ नोव्हेंबर) रोजी दुपारी १:०० ते १:३० यादरम्यान घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुधीर काते (४०, रा. लोटेमाळ, ता. खेड) हे गेल्या दहा वर्षांपासून लोटे एमआयडीसीमधील विविध कंपन्यांना मजूर पुरवण्याचे काम पाहतात. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास स्थानिक रहिवासी सचिन कालेकर आणि रोहन कालेकर यांनी काते यांना विजय केमिकल कंपनीचे मॅनेजर अनंत महाडिक यांनी कामाविषयी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती दिली.त्यानुसार काते आणि त्यांच्यासोबतचे दोन सहकारी कंपनीमध्ये आले. तेथे विक्रांत जाधव (रा. पागनाका, चिपळूण), सुमित शिंदे (रा. दसपटी, चिपळूण), विवेक आंब्रे (रा. आवाशी, खेड) तसेच सुमारे सात ते आठ अनोळखी कामगार उपस्थित असल्याचे काते यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीवरून चर्चा सुरू झाली असताना अचानक वातावरण ताणले गेले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी ‘तुम्ही स्थानिक म्हणजे काय?’ असा प्रश्न करत भांडणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ढकलाढकली, शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ व्हायरलकंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या वादाचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ करण्यात आला होता. त्यात विक्रांत जाधव एकाला धक्का देत असल्याचे दिसत आहे. तो आता वेगाने व्हायरल होत आहे. राजकीय पक्षांसह सर्वसामान्य लोकांमध्येही यावर चर्चा सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Bhaskar Jadhav's son booked for assault; dispute explained.

Web Summary : Bhaskar Jadhav's son, Vikrant, and others are booked for assaulting a Shinde Sena leader over local job demands at a chemical company in Khed. A video of the altercation went viral.