शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:02 IST

खेड तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली.

ठळक मुद्देअल्पवयीन युवतीवर बलात्कार करून खून, खेड तालुका हादरला नातेवाईक असलेला संशयित आरोपीला अटक

खेड : तालुक्यातील सुकीवली येथे एका चौदा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची विदारक घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. या प्रकरणी संशयित आरोपी सूर्यकांत चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले असून, तो दुर्दैवी पीडित मुलीचा नातेवाईक आहे, अशी माहिती खेडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी दिली.सुकीवली येथील युवती गुरूवारी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास चव्हाणवाडी येथून आपल्या घरी जात होती. ती घरी आली नाही म्हणून तिच्या आईने तिची शोधाशोध केली. रात्री तिचे वडील घरी आल्यानंतर त्यांनीही आसपास चौकशी केली. परंतु, कुठेही तिचा शोध लागला नाही. तिच्या आईवडिलांनी तत्काळ खेड पोलिसांना याबाबत माहिती दिली.या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपासकामाला सुरूवात केली. पोलिसांनी काही ग्रामस्थांकडून माहिती घेतली. त्यावेळी काही ग्रामस्थांकडून सूर्यकांत नवनाथ चव्हाण (२९) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी पहाटे अडीच -तीन वाजण्याच्या सुमारला त्याला ताब्यात घेतले. परंतु त्याने काहीही कबुल करण्यास नकार दिला.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बोलण्यास सुरूवात केली. सायंकाळी ती घरी जात असताना त्याने त्या पीडित मुलीला आजोबा घरी बोलवत आहेत, असे सांगून आपल्या घरी नेले. तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.आपले हे कृत्य उघड होऊ नये यासाठी त्याने तिला घराच्या मागील बाजूस असलेल्या संडासच्या टाकीत टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी नऊ वाजण्याच्या सुमाराला त्याला घटनास्थळावर नेऊन पंचनामा केला. त्यानंतर युवतीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीतून बाहेर काढण्यात आला.

तो विच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सूर्यकांत चव्हाण याला खेड येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दिनांक २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाRatnagiriरत्नागिरी