शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मंडणगडमध्ये ना हेलिपॅड, ना सुसज्ज विश्रामगृह; मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 14:04 IST

मंडणगड : गेल्या काही वर्षात तालुक्यात मंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. मात्र, तालुक्यात विविध सुविधा नसल्याने त्या पुरविताना अधिकाऱ्यांची ...

मंडणगड : गेल्या काही वर्षात तालुक्यात मंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. मात्र, तालुक्यात विविध सुविधा नसल्याने त्या पुरविताना अधिकाऱ्यांची धावपळ उडत आहे. राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री याठिकाणी हजेरी लावत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या हेलिपॅडसह विश्रामगृहाची पुरेशी व्यवस्था नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या मंत्र्यांच्या दाैऱ्यावेळी प्रशासकीय यंत्रणेची लगीनघाई सुरू हाेते.मागासलेला तालुका म्हणून प्रशासकीय स्तरावरून अजूनही मंडणगड यातून बाहेर पडलेला नाही. चक्रीवादळ, न्यायालय, यासह विविध कामांच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय, शासकीय पदाधिकाऱ्यांचे दौरे वाढले आहेत.  तालुक्यात एकाच वेळी आलेले विविध मंत्री याचबरोबर राष्ट्रपती यांच्या दौऱ्यासाठी करोडो रुपये खर्च काही तासांकरिता करण्यात आला. मात्र, त्यानंतर प्रशासनाने कायमस्वरुपीच्या उपाययोजना करणे अपेक्षित होते. पण, अद्यापही प्रशासनाकडून अशी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.तालुक्यात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध मंत्री आले असताना या ठिकाणी शासकीय विश्रामगृह त्याचबरोबर हेलिपॅडची सुविधा नसल्याने यंत्रणेची चांगली तारांबळ उडाली. तसेच तालुक्यात शासकीय विश्रामगृह सुस्थितीत  नसल्याने मंत्र्यांना विसावण्याकरिता अथवा बैठक घेण्याकरिता शासनाची जागा उपलब्ध नाही. तसेच याठिकाणी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था होताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मंत्र्यांच्या दाैऱ्यावेळी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उपस्थित राहतात. मात्र, त्यांची व्यवस्था दापोली, खेड तालुक्यांमध्ये करावी लागते. एका कार्यक्रमात तालुक्यात प्रशासनाकडून अनेक जागा तपासल्यानंतर मानवी वस्तीतील एका जागेत हेलिपॅड तयार करण्यात आले. मात्र, अन्य मंत्र्यांना दापोलीमध्ये हेलिकॉप्टरने यावे लागले व पुढील प्रवास मोटारीने करावा लागताे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीministerमंत्री