शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:24 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

रत्नागिरी : इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार करुन प्रकल्पाला विरोध केला आहे. केंद्राने पुन्हा निर्णय घेतला असेल तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलतील, त्यांच्या भावना समजून घेतील त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले.केंद्र सरकारने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आपली भूमिका मांडली.  मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर बरीच वर्ष प्रकल्पाचे काम बंद होते. कालच केंद्र सरकारने पुन्हा प्रकल्पाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक आमदार असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, लोकसभेचे सदस्य विनायक राऊत हे पुन्हा एकदा तेथील लोकांशी जाऊन चर्चा करतील. प्रकल्प कशापद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही.शिवसेनेने पूर्वी निर्णय घेतलेला होता तो जनतेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय होता. जनतेचा विरोध होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलत नाहीत, त्यांच्या भावना समजून घेत नाहीत, तोपर्यंत बोलणे उचित नाही, असे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीJaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पUday Samantउदय सामंत