शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone Ratnagiri : मंत्री उदय सामंत "ऑन फिल्ड",मदत "ऑन द स्पॉट"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:56 IST

Tauktae Cyclone Ratnagiri : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. उदय सामंत यांनी आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. आज दुपारपर्यंत नुकसानग्रस्त भागांना शिवसेनेतर्फे मदत पोहचवणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देनुकसानग्रस्ताना करणार "ऑन द स्पॉट" मदत जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी सुरु

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील नाणीज या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. उदय सामंत यांनी आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले. आज दुपारपर्यंत नुकसानग्रस्त भागांना शिवसेनेतर्फे मदत पोहचवणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले.मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली होती. नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. आज सकाळी ते रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून रत्नागिरी तालुक्यातील तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यास सुरुवात केली. नाणीज गावातील पाहणी दरम्यान तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच गौरव संसारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.त्यांनी खानू ग्रामपंचायतीला भेट देऊन नुकसानाबद्दल आढावा घेतला. यावेळी पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, तहसीलदार, सरपंच गणेश सुवारे उपस्थित होते. पाली पाथरट, माईन वाडी या गावी भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, विभाग प्रमुख तात्या सावंत, माझी सरपंच संदीप गराटे, प्रांत, तहसीलदार व उपस्थित होते. कापडगाव येथेही भेट देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी सरपंच विघ्नेश विश्वास कोत्रे उपस्थित होते.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळUday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी