शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अनुभवला मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 3:28 PM

adititatkare, guhagar, dhopawe, ratnagirinews दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमुळे मातीच्या वस्तूंच्या जागी आता प्लास्टिक, स्टीलची भांडी आली आहेत. त्यामुळे मातीपासून विविध वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. गुहागर तालुक्यातील धोपावे येथील उद्योजिका रसिका राजन दळी यांच्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनला राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धावती भेट दिली. राज्यातील या पहिल्या प्रकल्पाचे तटकरे यांनी भरभरून कौतुक करत स्वतः मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद अनुभवला.

ठळक मुद्देराज्यमंत्र्यांनाही भांडी बनविण्याचा मोहधोपवेच्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनला आदिती तटकरे यांची भेट

असगोली : दिवसेंदिवस वाढत्या गरजा व आधुनिकतेमुळे मातीच्या वस्तूंच्या जागी आता प्लास्टिक, स्टीलची भांडी आली आहेत. त्यामुळे मातीपासून विविध वस्तू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय डबघाईस आला आहे. गुहागर तालुक्यातील धोपावे येथील उद्योजिका रसिका राजन दळी यांच्या भूमी पॉटरी अँड क्ले स्टेशनला राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी धावती भेट दिली. राज्यातील या पहिल्या प्रकल्पाचे तटकरे यांनी भरभरून कौतुक करत स्वतः मातीपासून भांडी बनविण्याचा आनंद अनुभवला.गुहागर तालुक्यातील धोपावे येथील कृपा औषधाचे उद्योजक राजन दळी व रसिका दळी या दाम्पत्याने दिवाळीतील अभ्यंगस्नान साहित्य, इको-फ्रेंडली आधुनिक गुढी व अन्य भेटवस्तूंच्या यशस्वी प्रयोगानंतर काही वर्षापूर्वी मातीपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंना आधुनिकतेची जोड देत तयार केलेल्या वस्तू स्टॉल बरोबरच बिग बाजार आणि सातासमुद्रापार पोहोचविल्या आहेत.राज्यमंत्री तटकरे यांना खादी ग्रामोद्योगच्या प्रधानमंत्री योजनेच्या पोर्टलवर रसिका दळी यांच्या मातीपासून बनवण्यात येणाऱ्या उद्योगाची माहिती मिळाली होती. त्याचवेळी राज्यातील या पहिल्या प्रकल्पाला भेट देण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आलेल्या तटकरे यांनी वेळात वेळ काढून या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी रसिका दळी यांनी त्यांना मातीच्या कुंडीत लावलेले वृक्षाचे रोप देऊन स्वागत केले.दरम्यान, आदिती तटकरे यांनी प्रकल्पाची पाहणी करताना बारकाईने काम करणाऱ्या महिलांकडून प्रत्येक गोष्टी जाणून घेत होत्या. तसेच मातीची भांडी बनवणार्‍या एका मशीनवर चक्क स्वतः हातात माती घेऊन भांडी तयार करण्याचा अनुभव घेतला.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, उद्योजक राजन दळी, तहसीलदार लता धोत्रे, अजय बिरवटकर, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अधिकारी राजा आरेकर, किरण खरे, उमेश भोसले, प्रकाश रहाटे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, धोपावे सरपंच सदानंद पवार उपस्थित होते.मातीला आकारप्रकल्पात तयार केले जाणारे दही पॉट, कपबशी, ग्लास, पाण्याची बॉटल, कॉपी मग, तांब्याचा पेला, वॉलपीस, पेन स्टॅन्ड यांसारख्या सुमारे ६० वस्तू रसिका दळी दाखवल्या. या प्रकल्पात स्थानिक महिला मातीला आधुनिक पद्धतीने आकार देत वस्तू घडवत असल्याची माहिती दिली.नक्कीच मदत करूलहान प्रकल्पातूनच कोकण समृद्ध होऊ शकतो. हा प्रकल्प प्रदूषणविरहीत आणि स्थानिकांच्या हाताला काम देणारा असल्याने भविष्यात या प्रकल्पासाठी कोणतेही सहकार्य लागल्यास उद्योग खाते नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही तटकरेंनी दिली.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRatnagiriरत्नागिरीGuhagar Nagar Panchayatगुहागर नगरपंचायत