शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याचे मंत्री नितेश राणेंसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:48 IST

किनारपट्टी माहिती असलेला मंत्री मिळाल्याने आशा पल्लवित

रत्नागिरी : जिल्ह्यातील गाळाने भरलेली बंदरे, एलईडी लाइट मासेमारी, परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी, पारंपरिक-पर्ससीननेट मच्छीमार वाद, डिझेलवरील सबसिडी वेळेवर न मिळणे, मत्स्य दुष्काळ अशा अनेक समस्यांच्या गर्तेत मच्छीमार सापडलेला आहे. आजवर किनारपट्टीशी संबंध नसलेल्या भागात मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्रिपद जात असल्याने या समस्या ‘जैसे थे’ राहिल्या. मात्र, महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्री नितेश राणे यांच्यामुळे सागरी किनारपट्टीची आणि मच्छीमारांच्या समस्यांची माहिती असणारा मंत्री मिळाल्याने मच्छीमारांच्या समस्या मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील खाड्या, बंदरातील गाळ गेल्या कित्येक वर्षातून उपसला गेला नसल्याने खाड्या व बंदरे गाळाने भरली आहेत. या गाळामुळे मासेमारी नाैकांना समुद्रात ये-जा करणे अवघड हाेत आहे. काही वेळेला अपघाताच्याही समस्या निर्माण हाेतात. त्याचबरोबर पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससीननेट यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अंतरावरून वाद सुरू आहे. या वादावर अनेक वेळा ताेडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही.

शासनाकडून सवलतीच्या दरात मासेमारी नौकांना डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. मात्र, डिझेल खरेदीवर मच्छीमारांना सबसिडी देण्यात येते. ती सबसिडी दोन-दोन वर्षे शासनाकडे थकीत राहत आहे. ही सबसिडी वेळेत मिळण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. परराज्यातील मासेमारी नौकांची घुसखाेरी हे स्थानिक मच्छीमारांसमाेरील माेठी डाेकेदुखी ठरली आहे, तसेच एलईडी लाइटने हाेणाऱ्या मासेमारीमुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. या समस्यांबाबत शासनाने कठाेर निर्णय घेणे गरजेचे आहे.

किनारपट्टीशी निगडित मंत्रीआतापर्यंत खासदार नारायण राणे वगळता मासेमारी व्यवसायाशी नव्हे तर किनाऱ्याशी काहीही संबंध नसलेल्यांकडे मत्स्यव्यवसाय खात्याची धुरा देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून मच्छीमारांच्या समस्या काेणाला कळल्याच नाहीत. मात्र, आता सागरी किनारपट्टीची माहिती असणारे, मच्छीमारांच्या समस्यांची माहिती असणारे आमदार नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या समस्या साेडण्याची आशा निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी शहरातील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी मच्छीमारांचा लढा सुरू आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा. तसेच परराज्यातील मासेमारी नौकांपासून सुरू असलेली घुसखोरी थांबविण्यासाठी कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. -नजीर वाडकर, अध्यक्ष, मच्छीमार संघर्ष समिती, रत्नागिरी 

माशांचा ८० टक्के साठा हा किनारपट्टीला म्हणजेच १० ते १२ वावाच्या आतमध्ये असतो. तर पर्ससीन नेट हे त्याबाहेर मासेमारी करतात. त्यामुळे या २० टक्के साठ्यातील मासे मारण्यासाठी पर्ससीन नेट नौकांना किती अंतरावर जाळ्याने शोध घेऊन किती मासे मिळत असतील. त्यामुळे शासनाने पर्ससीन नेट मासेमारीवर ठरावीक अंतराबाबत घातलेली बंदी योग्य आहे का, याचा विचार होणे आवश्यक आहे. -इम्रान मुकादम, चेअरमन, मिरकरवाडा आदर्श मच्छीमार सहकारी सोसायटी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमारNitesh Raneनीतेश राणे