मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

By Admin | Updated: September 26, 2015 00:21 IST2015-09-25T23:39:50+5:302015-09-26T00:21:17+5:30

चाहुल निवडणुकीची : श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले

Millennium bill amounting to Mandangad | मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

मंडणगडवर लाखो रूपयांची खैरात

मंडणगड : तालुक्याची ग्रामपंचायत कुठल्याही निकषात बसत नसतानाही केवळ शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे नगरपंचायत होत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराच्या विकासासाठी निधीची खैरात केली जात आहे. सत्तेसाठी निधीची खैरात वाटणाऱ्या राजकीय पक्षांकडून शहराव्यतिरिक्त तालुका मात्र उपेक्षित राहिला आहे.मंडणगड तालुका विकासकामांसाठी अनुकूल होता, असे असले तरी नगरपंचायत अस्तित्त्वात येईपर्यंत याकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे लक्ष नव्हते. शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पाखाड्या, अनधिकृत खोके, पाणी प्रश्न यांसारखे अनेक विषय न सुटणारे कोडे बनले होते़ मात्र, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होताच शहरातील विकासकामांसाठी विविध पक्ष सत्तर लाखाहूनही अधिक निधी देण्यास तयार झाले आहेत़ आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात नुकतेच चाळीस लाखांच्या विकासकामाचे नारळ फोडले आहेत. भारतीय जनता पार्टीनेही शहरासाठी पंचवीस लाखांची विकासकामे देण्याचे जाहीर करुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
शहर बसस्थानक आवारातील प्रसाधनगृहाचे उद्घाटन याचवेळी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वीच विकासकामे होत आहेत़ दुसरीकडे मंडणगड पाटपन्हळे रस्ता, मंडणगड स्टॅण्ड परिसरातील प्रसाधनगृह अशा अनेक विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नही विविध राजकीय पक्षांकडून होत असल्याचे दिसत आहे़ आजवर शहरातील ग्रामपंचायतीत येथील नागरिकांनी विविध पक्षांना संधी दिली होती. मात्र, येथील समस्या दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व आता त्यासाठी लाखो रुपयांच्या निधीची खैरात ओतून सत्तेत येण्याची स्वप्न पाहात आहेत़
दुसरीकडे पंचायत समिती ते खासदारकीपर्यंतची सत्तेतील सर्व पायऱ्या सोबत असून, केवळ नाकर्तेपणामुळे शहराला विकासापासून दूर ठेवू पाहणाऱ्यांना तसेच आजवर आमच्या हातात काही नाही, असे म्हणवणाऱ्यांना अचानक शहर विकासाचा कसा पुळका आला आणि निधी कसा उभा केला? आजवर शहरातील या समस्या दिसत नव्हत्या का? असा सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)

नजीकच्या काही महिन्यातच नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा हक्काचा निधी नगरपंचायतीला मिळणार आहे़ त्यावेळी नगरपंचायत स्वत:चा विकास स्वत: करू शकणार आहे़, असे असताना केवळ नगरपंचायतीत आपले राजकीय अस्तित्व राखण्यासाठी विविध पक्ष सरसावले आहेत.

Web Title: Millennium bill amounting to Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.