शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर परिसरात स्थलांतरीत करकाेचा पक्ष्याचे दर्शन, तीन वर्षानंतर झालं पुन्हा आगमन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:12 IST

हा पक्षी गिधाडासारखा काहीसा दिसणारा असून, थव्याने राहण्याऐवजी एकटाच राहण्याला त्याची पसंती असते

राजापूर : केवळ पांढरी मान आणि शरीराचा अन्य भाग काळा अशी रंगछटा असलेला करकोचा-कांडेसर (कामऱ्या ढोक) या स्थलांतरीत पक्ष्यांचे सुमारे तीन वर्षानंतर राजापूर परिसरात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये अर्जुना नदीच्या काठावर आणि आडिवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव आहे.सीगल पक्ष्यांसह अन्य स्थलांतरीत पक्ष्यांचे तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आगमन होते. त्याप्रमाणे करकोचा-कांडेसर या पक्ष्याचेही तालुक्यामध्ये आगमन होत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. मात्र, मध्यंतरी काही वर्ष करकोचा-कांडेसर या पक्ष्याचे थंडीच्या कालावधीमध्ये तालुका परिसरामध्ये वास्तव्य आढळले नव्हते. 

गेल्या काही दिवसांपासून करकोचा पक्ष्यांच्या वास्तव्याने पक्षीप्रेमी सुखावले आहेत. काही वर्षापूर्वी वनविभागातर्फे पाणपक्ष्यांचे सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये विविध प्रकारच्या सतरा प्रजातींचे सुमारे दोनशेहून अधिक पक्षी आढळले होते. त्यामध्ये करकोचा-कांडेसर या पक्ष्याचाही समावेश होता.दुर्मीळ प्रजातींच्या पक्ष्यांचे तालुक्यात वास्तव असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. त्याच्यातून येथील निसर्ग पक्ष्यांच्या वास्तव्याला अनुकूल असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

एकटाच राहण्याला पसंतीकेवळ पांढरी मान आणि बाकी सर्व शरीर काळेकुळकुळीत अशी विचित्र मात्र, आकर्षक शरीराची रंगसंगती असलेला हा पक्षी गिधाडासारखा काहीसा दिसणारा असून, पाणथळी भागामध्ये बहुतांशवेळा वास्तव्याला आढळतो. थव्याने राहण्याऐवजी एकटाच राहण्याला त्याची पसंती असते.

मध्यंतरी हा पक्षी का गायब होता ? याचे निश्चित कारण स्पष्ट होत नाही. मात्र, त्यावेळची पर्यावरणीय स्थिती त्याच्या वास्तव्याला अनुकूल नसावी. त्यामुळेच ताे या भागात आलेला नसावा. यावेळी पर्यावरणीय स्थिती अनुकूल असल्याने त्याचे आगमन आणि वास्तव्य आहे. त्याचे झालेले आगमन आणि वास्तव्य सुखद आहे. - धनंजय मराठे, पक्षीमित्र

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbirds sanctuaryपक्षी अभयारण्य