मनसेने स्वखर्चातून बांधले प्रवासी निवारा शेड

By Admin | Updated: December 4, 2014 23:38 IST2014-12-04T22:49:52+5:302014-12-04T23:38:08+5:30

कडवई - धामणाकवाडी ही गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित होती.

Migrant shelter sheds built by MNS | मनसेने स्वखर्चातून बांधले प्रवासी निवारा शेड

मनसेने स्वखर्चातून बांधले प्रवासी निवारा शेड


आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई - धामणाकवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वखर्चातून बांधलेल्या प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन नुकतेच झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय संघटक परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व कडवईचे सरपंच बापू कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
कडवई - धामणाकवाडी ही गेली कित्येक वर्षे विकासापासून वंचित होती. याची दखल घेत वाडीतील सर्व युवकांनी एकत्र येत संघर्ष मित्रमंडळाची स्थापना केली आणि सर्वच राजकीय पक्षांना कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाऊन विकासासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. याची सुरुवात म्हणून चव्हाण यांच्या प्रयत्नांतून हा प्रवासी निवारा उभा राहिल्याचे मंडळाचे अध्यक्ष संजय धामणाक यांनी सांगितले. या प्रवासी शेड तसेच शाळेसाठी जागा उपलब्ध करुन देणारे जागामालक अब्दुल रशिद मोडक, दिलावर खान, आसिम मुल्ला यांचाही यावेळी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. विकासकामासाठी सहकार्य केल्याने चव्हाण तसेच सरपंच बापू कदम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शाळेतील ३० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी कडवई गावच्या विकासासाठी मनसेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनीही वाडीतील अनेक वर्षे रखडलेली विकासकामे संघर्ष मित्रमंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद पवार, उपतालुकाध्यक्ष डॉ. अमित ताठरे, जगदीश परकर, शेखर पांचाळ, विभाग अध्यक्ष संतोष पावस्कर, मनोहर घाटगे, शांताराम दहिवलकर, मनविसेचे तालुकाध्यक्ष अजिंक्य खैर, उपतालुकाध्यक्ष मयुर लिंबूकर, शाखाध्यक्ष चंद्रकांत मिरगल, राजू नांदलस्कर, महेश खामकर, राजू ब्रीद, नीलेश भुवड आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सावंत यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Migrant shelter sheds built by MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.