मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांना मायक्रोसॉफ्टचे पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:01+5:302021-09-13T04:30:01+5:30
असुर्डे : मायक्रोसॉफ्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मयुरेश माने, रणजित देसाई, ...

मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांना मायक्रोसॉफ्टचे पुरस्कार जाहीर
असुर्डे : मायक्रोसॉफ्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
वर्गातील अध्यापनात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला नव्याने वेगळे आयाम देणाऱ्या शिक्षकांना मायक्रोसॉफ्ट तर्फे हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु. (ता. चिपळूण) येथील उपक्रमशील शिक्षक मयुरेश माने, गुरुवर्य द. ज. सरदेशपांडे अध्यापक विद्यालय, कोदवली (ता. राजापूर) येथील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक रणजित देसाई तसेच मिस्त्री हायस्कूल (ता. रत्नागिरी) येथील उपक्रमशील शिक्षिका सुलताना भाटकर या तिघांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
रणजित देसाई यांना सलग दुसऱ्या वर्षी तर विशेष म्हणजे मयुरेश माने यांना रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देशातील व परदेशातील शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने टीचिंग केले जात आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने शिक्षक व विद्यार्थ्यांना एक लक्षवेधी अशी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वृत्तीला वाव देण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपक्रमशील शिक्षक मयुरेश माने यांनी केले आहे.
120921\img-20210910-wa0136.jpg
मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर