शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात मिळणार परसबागेतील ‘मायक्रोग्रीन’ भाजी

By शोभना कांबळे | Updated: July 18, 2023 13:32 IST

‘मायक्रोग्रीन’ भाज्या कोणत्या?

शोभना कांबळेरत्नागिरी : विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, त्यांना पोषक आहार मिळावा, या उद्देशाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा तयार केल्या जात आहेत. या परसबागांमधून पौष्टिक अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाल्याची (मायक्रोग्रीन) लागवड करावी व या पौष्टिक पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा, असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी (दि.११ जुलै २०२३) काढला आहे.केंद्र सरकारने परसबाग संदर्भातील निर्देश दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले होते. त्याअनुषंगाने राज्यात काही शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविला जात असून, विद्यार्थ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे आदींचा समावेश पोषण आहारात केला जात आहे. मात्र, काही शाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे हा उपक्रम राबविला जात नाही. सर्वच शाळांमध्ये कमी जागेतही विविध पर्यायांद्वारे अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाला लागवड हा उत्तम पर्याय ठरणार आहे. उपलब्ध जागा विचारात घेऊन परसबागांची निर्मिती करताना स्थानिक पातळीवरील अल्पकालीन सूक्ष्म (मायक्रोग्रीन) भाजीपाल्याची सेंद्रिय पद्धतीने लागवड करावी. यासाठी विद्यार्थ्यांचा वयोगट विचारात घ्यावा.विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ अशी पर्यावरणपूरक खते तयार करण्यास शिकवावे, अशी सूचना केली आहे. या उपक्रमाकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

रत्नागिरी आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रमोद जाधव यांनी शिक्षण खात्याचे प्रधान सचिव रणजित सिंह देवोल यांची भेट घेऊन शालेय परसबाग उपक्रमामध्ये कमी जागेचा आणि कमी वेळेचा पौष्टिक व अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाला (मायक्रोग्रीन ) लागवडीचा समावेश करण्याबाबत सूचना केली. या भाज्यांच्या लागवडीविषयी माहितीही दिली. देवोल यांनी हा शासन निर्णय काढण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला.

अनेक शाळांमध्ये परसबागेसाठी जागा कमी असते. परंतु, उपलब्ध जागेचा वापर करून शाळांनी अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाल्याची (मायक्रोग्रीन) लागवड करून पोषण आहारात समावेश केल्यास मुलांना पाैष्टिक भाज्या मिळतील. - प्रमोद जाधव, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग

 

‘ मायक्रोग्रीन ’ भाज्या कोणत्या?मेथी, वाल, हरभरा, मूग, बीट, मका, मुळा, मोहरी, सूर्यफूल, कांदा, वाटाणा, चवळी, पालक, राजमा, गहू (गव्हांकूर).

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थी