संदेश पारकर सेनेत प्रवेश करणार?

By Admin | Updated: October 10, 2015 23:49 IST2015-10-10T23:49:33+5:302015-10-10T23:49:48+5:30

तर्कवितर्कांना ऊत : विनायक राऊत यांनी घेतली भेट

The message will enter the crossing? | संदेश पारकर सेनेत प्रवेश करणार?

संदेश पारकर सेनेत प्रवेश करणार?

कणकवली : काँग्रेसमधील नाराज युवा नेते व कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीत आपल्या गटाचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात यशस्वी ठरलेल्या संदेश पारकर यांची शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट घेतली. त्यामुळे संदेश पारकर हे लवकरच शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता गडद झाली आहे.
विनायक राऊत यांनी शनिवारी संदेश पारकर यांच्या घरी जात नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. यामुळे संदेश पारकर यांच्या सेनाप्रवेशाची जोरदार चर्चा सिंधुदुर्गात सुरू झाली. कॉँग्रेसमध्ये नाराज असलेले संदेश पारकर युतीतील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल तर्कवितर्क लढविले
जात होते.
नगराध्यक्ष निवडीत कॉँग्रेसविरुद्ध बंड पुकारल्यानंतर कॉँग्रेसमधून ते बाहेर पडणार हे निश्चितच झाले. शनिवारी खासदार राऊत यांच्या भेटीने ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला बळकटी मिळाली. यावेळी भाजपचे चिटणीस राजन तेली, संदेश पारकर, राजन वराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, रूपेश नार्वेकर, आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, आम्हाला कणकवली नगरपंचायतीमध्ये कलूषित राजकारणाचा अनुभव आला. नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार निधीतून काही कामे प्रस्तावित केली असतानाही निधी नाकारण्यात आला. संदेश पारकर हे वाहत्या गंगेत हात धुऊन घेणाऱ्यांपैकी नाहीत. संदेश पारकर यांची कॉँग्रेसमध्ये घुसमट करण्यात आली.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी संदेश पारकर, आमदार वैभव नाईक यांच्यासारखी मंडळी आहेत. कणकवली विकासाकडे झेपावणारे शहर असून, अनेक समस्याही आहेत. (प्रतिनिधी)
पारकरांना उभारी देण्याचा प्रयत्न करतोय
यावेळी संदेश पारकर हे हरहुन्नरी कार्यकर्ते असून, आम्ही त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही अटीशर्तींशिवाय त्यांना आम्ही पाठबळ देत आहोत. सर्वांत जास्त गद्दारी करणाऱ्यांनी दुसऱ्यांवर गद्दारीचे आरोप करू नये, अशी नारायण राणे यांचे नाव घेता राऊत यांनी टीका केली. संदेश पारकर नगराध्यक्ष असताना कणकवलीचा विकास चांगला झाला. पुन्हा आता त्यांच्या हातात शहराची धुरा आली आहे. अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी यशस्वीपणे नगराध्यक्षपदाची कारकीर्द पार पाडली.
 

Web Title: The message will enter the crossing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.