देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:13+5:302021-08-22T04:34:13+5:30
देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विभागांत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे काैतुक करण्यात आले. हा ...

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार
देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विभागांत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे काैतुक करण्यात आले. हा सोहळा आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या कै.द.ज. कुलकणी सभागृह येथे आयाेजित करण्यात आला हाेता.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष सदानंद भागवत, सचिव शिरीष फाटक, वेदा प्रभुदेसाई, भालचंद्र भावे, प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा.एम.आर. लुंगसे, मुख्याध्यापिका माया गोखले, सोनाली नारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका माया गोखले यांनी केले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल आणि सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील श्रावणी सुयोग साने, प्रांजली दीपक भायजे, मैथिली नितीन गीते, आर्यन प्रकाश ओकटे, श्रावणी नंदकुमार वंजारे, अर्णव विनायक कुलकर्णी, जान्हवी विश्वास फडके, श्वेता चंद्रकांत सुर्वे, पल्लवी संजय पाष्टे, नुपूर मंगेश प्रभुदेसाई, सृष्टी संजय कोरे यांचा गाैरव केला. त्याचबराेबर, अ.अ. पाध्ये स्कूलमधील सायना सुहेल कोंडकरी, जान्हवी विलास वेलवणकर, अनुज शरद गार्डी, हर्षाली प्रशांत चव्हाण, साहिल उदय मोरे, साक्षी प्रसन्न सार्दळ, आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील साक्षी बाब्या वरक, दीप्ती दीपक जाधव, सिद्धी मंगेश मुंडेकर, स्नेहल सुहास मोरे, श्रेया प्रदीप सावंत, सोनाली राजेंद्र सुर्वे, सिद्धी कमलाकर नार्वेकर, सुप्रिया पांडुरंग कळंबटे, प्रीती संतोष निंबरे या विद्यार्थ्यांचा गाैरव करण्यात आला. कार्यक्रमात वेदा फडके, वेदा प्रभुदेसाई, प्रशांत चव्हाण, पायल वरक, सुहास मोरे व राजेंद्र सुर्वे या पालकांनी मनाेगत व्यक्त केले.
210821\img-20210817-wa0012.jpg
दहावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त आणि ९०% हून अधिक गुण प्राप्त केलेल्या सन्मानित विद्यार्थ्यांसोबत उपस्थित मान्यवर