आबलाेलीतील व्यापाऱ्यांनी केली काेराेना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:44+5:302021-04-11T04:31:44+5:30

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामकृती दल व पोलीस प्रशासनाने सर्व व्यापाऱ्यांना काेविड चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ...

Merchants in Abelli tested Kareena | आबलाेलीतील व्यापाऱ्यांनी केली काेराेना चाचणी

आबलाेलीतील व्यापाऱ्यांनी केली काेराेना चाचणी

Next

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामकृती दल व पोलीस प्रशासनाने सर्व व्यापाऱ्यांना काेविड चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आबलाेलीतील सर्व व्यापाऱ्यांनी काेराेना चाचणी करून घेतली.

आबलोली बाजारपेठेतील ज्या व्यापाऱ्यांजवळ कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असेल त्यांनाच दुकान उघडण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार पंचायत समिती गुहागरच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी प्राथमिक केंद्र आबलोली येथे भेट दिली. कोविड चाचणी, लसीकरण याविषयी माहिती घेतली. व्यापारी बांधवांनी आपली कोरोना तपासणी करून घ्यावी. या तपासणीचा अहवाल चार दिवसांनी मिळतो. तो लवकरात लवकर करून आपले व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग सुकर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व व्यापारी बांधवांच्या प्राधान्याने तपासणी व लसीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्याला प्रतिसाद देत आबलोलीतील व्यापारी, कर्मचारी यांनी कोविड चाचणीसाठी आपले स्वॅब दिले. अहवाल निगेटिव्ह आलेले व्यापारी आपले व्यवसाय सुरू करणार आहेत.

Web Title: Merchants in Abelli tested Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.