रत्नागिरी येथील मंथन खांडके प्रथम
By Admin | Updated: January 7, 2015 23:58 IST2015-01-07T22:19:03+5:302015-01-07T23:58:13+5:30
समर्थ रंगभूमी : फणसेकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धा

रत्नागिरी येथील मंथन खांडके प्रथम
रत्नागिरी : येथील समर्थ रंगभूमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. अविनाश फणसेकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धेत रत्नागिरीच्या मंथन खांडकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि कै. चंद्रकांत सुर्वे स्मृती करंडक पटकावला.
समर्थ रंगभूमीच्या प्रांगणात सलग २४ वर्षे अविरतपणे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि संस्थेचा अध्यक्ष अशा विविध भूमिकातून सेवा करणाऱ्या फणसेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सलग तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्नेहल जोशी यांनी, तर तृतीय क्रमांकाचे स्मृतिचिन्ह दापोलीच्या मंगेश कासेकर यांनी पटकावले.
उत्तेजनार्थ पारितोषिक सायली सुर्वे आणि श्वेता राणी सावंत यांना देण्यात आले. शरद ओरसकर स्मृती पारितोषिक लक्षवेधी पुरुष प्रथमेश भाटकर, तर लक्षवेधी स्त्री सुरेखा नाखरेकर यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून सुहास साळवी, अजित पाटील यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. शशांक पाटील यांच्याहस्ते विनायक हातखंबकर यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन रमेश कीर आणि नमिता कीर यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ विनायक हातखंबकर, शशांक पाटील, अनुया बाम, अमरिश फणसेकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी भाई दळवी, मंदार दळवी, आसावरी फणसेकर, प्रवीण मलुष्टे, शिंदे, दादा लोगडे, मिलिंद सावंत, दिलीप सागवेकर, सुशील जाधव, अमित सुर्वे, शंकर वरक, विनय घोसाळकर, दत्तात्रय सावंत, समीक्षा सावंत, आबा सावंत, मीना मलुष्टे, चंद्रमोहन देसाई श्रीकांत पाटील यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)