सदस्यत्वच धोक्यात

By Admin | Updated: November 29, 2015 01:03 IST2015-11-29T01:03:49+5:302015-11-29T01:03:49+5:30

ग्रामपंचायत निवडणुका : ४१४ सदस्यांनी खर्चच जमा केला नाही

Membership is in danger | सदस्यत्वच धोक्यात

सदस्यत्वच धोक्यात

राजापूर : राजापूर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील ४१४ ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने त्यांचे सभासदत्व धोक्यात आले आहे. ३० दिवसांच्या आत हे खर्चाचे विवरण पत्र न दिल्याने त्यांच्यावरील कारवाई अटळ बनली आहे.
एप्रिल महिन्यात राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये बिनविरोध निवडणुका वगळता उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये ८१५ उमेदवार रिंगणात होते. निकाल लागल्यानंतर पुढील ३० दिवसांत उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचे विवरणपत्र निवडणूक कार्यालयाकडे सादर करावयाचे होते. मात्र, ४१४ ग्रामपंचायत सदस्यांनी ते अद्याप सादर केले नसल्याचे आढळून आले आहे.
अणसुरे १२, मंदरुळ १७, शीळ ४, गोठणे दोनिवडे ९, दोनिवडे १०, कोंंडीवळे ११, आंबोळगड १९, सौंदळ १६, कुवेशी १८, शिवणेखुर्द ३, धोपेश्वर ६, महाळुंगे ४, कारवली १, सावडाव ४, ओशिवळे १०, पन्हळेतर्फे सौंदळ ५, कोळंब १७, काजिर्डा ९, मिळंद - सावडाव ९, हातदे ८, कुंभवडे ३, दळे ४, ओणी १०, चुनाकोळवण ७, कोदवली ८, पांगरे बु. ७, तळगाव ५, तारळ ९, वाडापेठ ८, कशेळी ११, कोंडसर १२, तुळसवडे ८, रायपाटण १५, ताम्हाणे १५, मोरोशी ५, चिखलगाव ४, आडवली १३, गोवळ ५, उन्हाळे ७, ससाळे २, पडवे ३, फुफेरे ३, आंबोळगड ११, पांगरेखुर्द ९, कोतापूर १, करक ६, हरळ ७, परटवली ७, वाल्ये ६ असा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, त्यावर या सर्व उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)
कारवाई होणार? : बहुतांशी विजयी उमेदवार
राजापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य हे विजयी उमेदवार असून, त्यांच्यावर अपात्रतेची तर पराभूत उमेदवारांवर ५ वर्षे निवडणूक न लढवण्याची कारवाई होऊ शकते. या उमेदवारांनी आपल्या खर्चाचे तपशीलवार विवरण सादर न केल्याने ही कारवाई निश्चित मानली जात आहे.

Web Title: Membership is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.